पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना एलन मस्क यांचे वडिल Errol musk नेमकं काय म्हणाले ?

पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना एलन मस्क यांचे वडिल Errol musk नेमकं काय म्हणाले ?

30
पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना एलन मस्क यांचे वडिल Errol musk नेमकं काय म्हणाले ?
पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना एलन मस्क यांचे वडिल Errol musk नेमकं काय म्हणाले ?

अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांचे वडील एरोल मस्क (Errol musk) हे नुकतेच सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर होते. एरोल मस्क (Errol musk) यांनी त्यांच्या सहा दिवसांच्या भारत दौऱ्यात अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर आणि हनुमानगढी मंदिराला भेट दिली. त्यांनी अयोध्येतील राम मंदिराला भेट देणे हे त्यांनी आतापर्यंत केलेल्या “सर्वोत्तम गोष्टींपैकी एक” असल्याचे म्हटले आहे. (Errol musk)

यावेळी एरोल मस्क (Errol musk) यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला वाईट गोष्ट होती असे म्हटले असून, अशी कृत्ये करणाऱ्यांना थांबवले पाहिजे असही त्यांनी म्हटले. भारताची दहशतवादाविरुद्धची लढाई आणि पाकिस्तानबरोबरच्या तणावाबद्दल बोलताना एरोल मस्क म्हणाले की, “ही खूप वाईट गोष्ट आहे. जगात मूर्ख लोक आहेत आणि आपल्याला त्यांचे काहीतरी करावे लागेल. ते त्यांच्या मर्जीने वागू शकत नाहीत. त्यांना थांबवले पाहिजे.”

हेही वाचा-Konkan Railway : मुंबई – मडगाव मार्गावर १४ जूनला एकतर्फी विशेष रेल्वे धावणार

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारताने केलेल्या अचूक हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. (Errol musk)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.