-
ऋजुता लुकतुके
गेल्या काही दिवसांत ५०० रुपयांच्या नोटा बंद करण्यात येणार असल्याच्या बातम्या सगळीकडे पसरत आहेत. दोन हजारांच्या नोटेप्रमाणे सरकार आता ५०० रुपयांची नोटही बंद करण्याची शक्यता असल्याचे संदेश फिरत आहेत. या चर्चेला आधार आहे तो म्हणजे रिझर्व्ह बँकेचा एक ताजा निर्णय. सर्व बँकांनी त्यांच्या एटीएममध्ये १०० आणि २०० रुपयांच्या नोटांची संख्या वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर ५०० रुपयांची नोटही बंद केली जाणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (500 Rupee Note)
सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चांवर पीआयबी फॅक्ट चेक युनिटने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. पीआयबीने म्हटले आहे की, कॅपिटल टीव्ही नावाच्या एका यूट्यूब चॅनेलने ५०० रुपयांच्या नोट बंद केल्याची बातमी दाखवली आहे. यात कोणतेही तथ्य नाही आणि ते पूर्णपणे खोटे आहे. आरबीआयने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही आणि ती सध्याप्रमाणेच येत्या काळातही ५०० रुपयांच्या नोटा चलनात राहतील. ५०० रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात यावी, त्या नोटा चलनातून मागे घेण्यात याव्यात अशी मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर या चर्चांना उधाण आलं. परंतु यावर पीआयबी फॅक्ट चेकने स्पष्टीकरण दिल्यानंतर ५०० च्या नोटा या चलनात कायम राहतील याबद्दल शंका उरली नाही. (500 Rupee Note)
(हेही वाचा – Bangalore Stampede : बाहेर चेंगराचेंगरी होऊनही आरसीबीने विजयोत्सव सुरू ठेवल्यामुळे टीका)
Is the ₹500 note set to be phased out by 2026? 🤔
A #YouTube video on the YT Channel ‘CAPITAL TV’ (capitaltvind) falsely claims that the RBI will discontinue the circulation of ₹500 notes by March 2026.#PIBFactCheck
✔️@RBI has made NO such announcement.
✔️₹500 notes have… pic.twitter.com/NeJdcc72z2
— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 3, 2025
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मे २०२३ मध्ये २००० च्या नोटांचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर दोन वर्षांनंतर, मे २०२५ मध्ये मध्यवर्ती बँकेने जाहीर केलं की २००० च्या नोटांमध्ये ६,२६६ कोटींची रक्कम अजूनही चालनात आहे. म्हणजेच ९८.२४ टक्के नोटा बँकेत परत आल्या आहेत. (500 Rupee Note)
उच्च मूल्याच्या नोटांचा वापर कमी करणे : उच्च मूल्याच्या नोटांचा वापर काळा पैसा आणि मोठ्या प्रमाणात नगदी व्यवहारांसाठी होऊ शकतो, त्यामुळे त्यांचा वापर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन : नगदी व्यवहारांऐवजी डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी २००० च्या नोटांचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला. (500 Rupee Note)
नोटांची गुणवत्ता आणि मुद्रण खर्च : २००० च्या नोटांची गुणवत्ता आणि मुद्रण खर्च यांबद्दल चिंता व्यक्त केली गेली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community