India Tour of England : श्रेयस अय्यरला संघातून का वगळलं; गंभीरने दिलं ‘हे’ उत्तर

India Tour of England : २० जूनपासून भारताचा इंग्लंड दौरा सुरू होत आहे. 

88
India Tour of England : श्रेयस अय्यरला संघातून का वगळलं; गंभीरने दिलं 'हे' उत्तर
  • ऋजुता लुकतुके

आयपीएल संपल्यानंतर आता भारतीय संघ पुढच्या तीन महिन्यांसाठी पांढरे कपडे घालून खेळताना दिसेल आणि खेळ लाल चेंडूचा असेल. २० जूनपासून इंग्लंडमधील पहिला कसोटी सामना हेडिंग्ले इथं सुरू होत आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नवीन आव्हानाला सामोरं जाणार आहे. गिलला उपकर्णधार म्हणून साथ मिळेल ती रिषभ पंतची. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने संघात करुण नायरच्या समावेशाचे संकेतही दिले आहेत. त्यामुळे फलंदाजीची धुरा, जयस्वाल, गिल यांच्याबरोबर के. एल. राहुल आणि करुण नायरवर असेल. (India Tour of England)

(हेही वाचा – IPL 2025, RCB Champions : विराटच्या आईने असा केला बंगळुरू विजयाचा आनंद साजरा)

इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने मुंबईत पत्रकारांसमोर काही अवघड प्रश्नांना उत्तरं दिली. यातील पहिलाच प्रश्न होता, ‘श्रेयस अय्यरला का वगळलं?’ गंभीरने आपली रणनीती आणि योजना स्पष्टपणे बोलून दाखवली. ‘संघात फक्त १८ खेळाडू निवडता येतात. पण, खेळाडू फॉर्मात असेल तर कुणालाही बोलावून घेतलं जाऊ शकतं. खेळाडूचा फॉर्म चांगला असेल आणि संघाला त्याचा उपयोग होणार असेल तर अशा खेळाडूचं संघात स्वागतच आहे,’ असं गंभीर उत्तर देताना म्हणाला. (India Tour of England)

(हेही वाचा – Railway Accident : प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर; धावत्या ट्रेनमधून पडून एकाने गमावला हात)

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यापासून श्रेयस अय्यरला वगळल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. आयपीएलमध्ये पंजाब किंग्जला अंतिम फेरीत घेऊन गेल्यानंतर या विषयावर चर्चा आणखी वाढली आहे. अलीकडेच निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. ‘कसोटीत श्रेयसला संघात जागा निर्माण करावी लागेल,’ अशा आशयाचं विधान आगरकरने केलं होतं. (India Tour of England)

(हेही वाचा – Russia-Ukraine War : रशियाचे युक्रेनवर ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ले; ४ जण ठार)

भारतीय संघाचा इंग्लंड दौऱ्यातील कार्यक्रम

हेडिंग्ले कसोटी – २० ते २४ जून

एजबॅस्टन कसोटी – २ ते ६ जुलै

लॉर्ड्स कसोटी – १० ते १४ जुलै

ओल्ड ट्रॅफर्ड कसोटी – २३ ते २७ जुलै

ओव्हल कसोटी – ३१ जुलै ते ४ ऑगस्ट

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.