-
ऋजुता लुकतुके
विराट कोहली हा १८ वर्षं एकाच फ्रँचाईजीबरोबर राहिलेला पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू आहे. पण, तीनदा अंतिम फेरी गाठूनही या फ्रँचाईजीने आतापर्यंत एकदाही आयपीएल चषक जिंकला नव्हता. त्यामुळे अठराव्या प्रयत्नांत चषकावर नाव कोरल्यानंतर विराट कोहली भावूक झाला होता. मैदानातच जमिनीवर डोकं टेकून त्याने भावनांना वाट मोकळी करून दिली. विराटच्या आईची अवस्था दिल्लीतील घरी काही वेगळी नव्हती. त्यांनाही टीव्हीवर सामना पाहिल्यानंतर भावना अनावर झाल्या होत्या. (IPL 2025, RCB Champions)
विराट बरोबर त्याची पत्नी अनुष्का शर्मा अहमदाबाद इथं उपस्थित होती आणि दोघांनी मैदानातच एकत्र आनंद साजरा केला. विजेतेपदानंतर विराटने पाठिराख्यांचे आभार मानणारी एक सोशल मीडिया पोस्टही दुसऱ्या दिवशी जारी केली. ‘१८ वर्षांनंतर अखेर तू हातात आलास,’ असं विराट चषकाकडे पाहून म्हणत आहे. (IPL 2025, RCB Champions)
(हेही वाचा – PM Narendra Modi यांच्या हस्ते चिनाब ब्रिजचे उद्घाटन ! १० तासांचा प्रवास आता ३ तासांत)
त्यानंतर आता विराट कोहलीची आई सरोज कोहली यांनी त्यांच्या घरी केलेला जल्लोषही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराटची बहीण भावना कोहली यांनी घरातील काही फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. त्यांनाही चाहत्यांनी पसंती दिली आहे. घरातील लोक एकमेकांना मिठी मारताना दिसतात. तर आई सरोज आणि बहीण भावना यांचे डोळे पाणावलेले आहेत. (IPL 2025, RCB Champions)
(हेही वाचा – Repo Rate Cut : रिझर्व्ह बँकेची ५० अंशांची रेपो दर कपात, कर्जाचे हफ्ते होणार स्वस्त)
बहीण भावनाने इन्स्टाग्रामवरही एक मोठी भावपूर्ण पोस्ट लिहिली आहे. ‘तुझी आयपीएल विजेतेपदासाठीची प्रतीक्षा खूपच मोठी आणि अनुभवल्याशिवाय न समजणारी आहे. आज या क्षणी आम्ही सगळे तुझ्यासाठी खुश आहोत आणि तुला हा दिवस दाखवला यासाठी देवाचेही आम्ही आभारी आहोत,’ असं भावना कोहली यांनी म्हटलं आहे. विराटचे वडील आकाशातून हा विजय पाहात असतील आणि ते ही विराटसाठी खुश असतील, असंही तिने म्हटलं आहे. (IPL 2025, RCB Champions)
विराटने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. त्यामुळे भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत असताना विराट विश्रांती घेणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिकेत तो खेळताना दिसेल. (IPL 2025, RCB Champions)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community