Pakistani Spy : हिंदू देवतांच्या फोटोआडून पाकिस्तानी करत होते हेरगिरी !

Pakistani Spy : हिंदू देवतांच्या फोटोआडून पाकिस्तानी करत होते हेरगिरी !

121
Pakistani Spy : हिंदू देवतांच्या फोटोआडून पाकिस्तानी करत होते हेरगिरी !
Pakistani Spy : हिंदू देवतांच्या फोटोआडून पाकिस्तानी करत होते हेरगिरी !

महाराष्ट्र एटीएसच्या हेरगिरी प्रकरणाच्या तपासात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पाकिस्तानी (Pakistani Spy) गुप्तचर नेटवर्कने भारतात काम करण्यासाठी केवळ हनीट्रॅपचा अवलंब केला नाही तर व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम अकाउंटच्या प्रोफाइल फोटोमध्ये भगवान राम-सीता आणि प्रसिद्ध मंदिरांचे फोटो लावले. जेणेकरून भारतीय लोकांना ते आपले वाटतील. या प्रोफाईल्सचं लोकेशन टॅगिंग देशातील मंदिरं आणि धार्मिक स्थळांशी देखील जोडले गेलं होतं, जेणेकरून हे नंबर भारतातील दिसतील आणि कोणालाही संशय येणार नाही. (Pakistani Spy)

हेही वाचा-Bangalore Stampede : ‘क्रिकेटसाठी दुर्दैवी दिवस’ – जगभरातील क्रिकेटपटूंच्या चेंगराचेंगरीवर प्रतिक्रिया

सांस्कृतिक चिन्हांद्वारे विश्वास जिंकण्यासाठी आणि संशय टाळण्यासाठी ही एक सुनियोजित रणनीती होती असे तपास यंत्रणांचा विश्वास आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी रवी वर्माला गुरुवारी ठाणे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वर्मावर भारतीय युद्धनौकांशी संबंधित संवेदनशील माहिती लीक केल्याचा गंभीर आरोप आहे. (Pakistani Spy)

हेही वाचा- Northeast floods: ईशान्येकडील राज्यांमध्ये पुराचा कहर कायम ! आसाममध्ये रेल्वे सेवा प्रभावित, अरुणाचलमध्ये परिस्थिती गंभीर

एटीएसने न्यायालयाला सांगितलं होतं की, त्यांना नवीन इलेक्ट्रॉनिक पुरावे सापडले आहेत, ज्याच्या तपासासाठी रिमांडची आवश्यकता आहे, परंतु न्यायालयाने ते नाकारलं. रवी वर्माच्या वतीने वकील रूपाली शिंदे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, एटीएसच्या तपासात विरोधाभास आहे. एटीएस अधिकाऱ्यांनी सांगितलं की ‘प्रीती जयस्वाल’ आणि ‘सर’ ही नावं प्रत्यक्षात पाकिस्तान इंटेलिजेंस ऑपरेटिव्ह (पीआयओ) नेटवर्कद्वारे वापरली जाणारी खोटी नावं आहेत. (Pakistani Spy)

हेही वाचा- शाळेची फी न भरल्याबद्दल ३१ विद्यार्थ्यांना केलं निलंबित ; Delhi High Court ने शाळेला फटकारलं

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हनीट्रॅप ऑपरेशनमध्ये अनेक मोबाईल नंबर वापरले गेले होते जे दिल्ली, मुंबई, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये रजिस्टर होते आणि बनावट कागदपत्रांद्वारे सिमकार्ड मिळवून एक्टिव्ह केले गेले होते. तपासात असं दिसून आलं आहे की, या एजंटचे नंबर रवी वर्माच्या मोबाईलमध्ये ‘प्रीती फ्रेंड’, ‘जसप्रीत कॉलेज फ्रेंड’, ‘निशा फ्रेंड’, ‘आकृती फ्रेंड’ अशा सामान्य नावांनी सेव्ह केले गेले होते. (Pakistani Spy)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.