India Tour of England : पहिल्या कसोटी सामन्याकरिता इंग्लंडचा संघ जाहीर; कुणा-कुणाचा संघात समावेश?

India Tour of England : भारताविरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्याकरिता इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. आगामी कसोटी मालिकेकरिता टीम इंडियाने याआधीच संघ जाहीर केला आहे.

47

India Tour of England : भारताविरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्याकरिता इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. आगामी कसोटी मालिकेकरिता टीम इंडियाने याआधीच संघ जाहीर केला आहे. आता इंग्लंडकडून औपचारिकरित्या संघातील खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर झाला आहे.(India Tour of England)

 

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने गुरुवार, ०५ जून दिवशी पहिल्या कसोटी सामन्याकरिता १४ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा याआधीच केली असून शुभमन गिलकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली २० जूनपासून भारतविरुद्ध ०५ सामन्यांची कसोटी मालिका २० जून ते ०४ ऑगस्ट या कालावधीत खेळविली जाणार आहे.

(हेही वाचा Sharmishtha Panoli : अखेर अंतरिम जामीन मंजूर, पोलीस संरक्षणाचे आदेश; शर्मिष्ठा पानोली प्रकरणात काय घडतयं?, वाचा संपूर्ण घटनाक्रम )

इंग्लंडने जाहीर केलेल्या कसोटी संघात स्टार खेळाडू जो रूट, ऑली पोप आणि बेन डकेट यासारखे अनुभवी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्याचसोबत, काही नवोदित खेळाडूंचीही निवड करण्यात आली आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघात बेन स्टोक्स(कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, जेमी ओव्हरटन, जोश टंग, ख्रिस वोक्स.

भारताचा इंग्लंड दौऱ्यासाठी कसोटी संघ : शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, ध्रुव जुरेल.(India Tour of England)

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेचे वेळापत्रक

 

पहिली कसोटी, २०-२४ जून, २०२५ – हेडिंग्ले, लीड्स

दुसरी कसोटी, ०२-०६ जुलै, २०२५ – एजबॅस्टन, बर्मिंगहॅम

तिसरी कसोटी, १०-१४ जुलै, २०२५ – लॉर्ड्स, लंडन

चौथी कसोटी, २३-२७ जुलै, २०२५ – ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

पाचवी कसोटी, ३१ जुलै- ०४ ऑगस्ट २०२५ – द ओव्हल, लंडन

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.