Naxal Encounter: छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये चकमक; नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य सुधाकर ठार

64

Naxal Encounter : बिजापूर जिल्ह्यात डीआरजी आणि एसटीएफने नॅशनल पार्क परिसरात नक्षलवाद्यांविरोधात चालवलेल्या संयुक्त अभियानामध्ये नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य असलेला सुधाकर हा मारला गेल्याचा प्राथमिक वृत्त आहे. सुधाकर याच्यावर सरकारने ४० लाख रुपयांचं बक्षीस घोषित केलं होतं. (Naxal Encounter)

(हेही वाचा – Bakri Eid : गोकुळधाममधील बकऱ्याच्या कुर्बानीसाठी दिलेली परवानगी अखेर रद्द; रहिवाशांच्या विरोधानंतर प्रशासनाने घेतला निर्णय)

छत्तीसगडमधीस (Chhattisgarh) बिजापूर जिल्ह्यात नॅशनल पार्क परिसरात डीआरजी आणि एसटीएफने नक्षलवाद्यांविरोधात चालवलेल्या संयुक्त अभियानादरम्यान, नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये भीषण चकमक झाली. या चकमकीदरम्यान, सुरक्षा दलांनी इतर नक्षलवाद्यांसह नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य असलेला सुधाकर यालाही घेरले. तसेच या चकमकीत तो मारला गेला. अशी माहिती मिळाली आहे.

बिजापूरचे पोलीस अधीक्षक डॉक्टर जितेंद्र यादव (Jitendra Yadav) यांनी सुरक्षा दल आणि नक्षवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीला दुजोरा दिला आहे. मात्र सुधारक हा मारला गेला की नाही, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, जवान या परिसरात शोधमोहिम राबवत आहेत. या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते, असेही सांगण्यात येत आहे. तसेच या चकमकीदरम्यान, मोठ्या प्रमाणावर हत्यारे आणि इतर सामान जप्त करण्यात आलं आहे. ही चकमक बिजापूरमधील घनदाट जंगलामध्ये झाली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.