Fraud Marshal : पाकिस्तान्यांनी थेट टाइम्स स्क्वेअरवर उडवली त्यांच्याच लष्करप्रमुखाची खिल्ली

Fraud Marshal : टाइम्स स्क्वेअरवर अशी टोकाची खिल्ली उडवण्यामागे देशातील लष्करी हस्तक्षेप, राजकीय अराजकता आणि इम्रान खान यांच्या अटकेविरोधातील संताप आहे.

165

अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर (Times Square) अलीकडेच झळकलेल्या एका डिजिटल बिलबोर्डने पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल जनरल असीम मुनीर (Field Marshal General Asim Munir) यांना जागतिक स्तरावर चर्चेचा विषय बनवले आहे. टाइम्स स्क्वेअरवर ‘Fraud Marshal’, ‘Liar’ आणि ‘The Deceiver’ अशा शब्दांत जनरल मुनीरसह पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावरही तीव्र निशाणा साधण्यात आला आहे.

(हेही वाचा – बकरी ईदसाठी Mumbai Local मधून बकऱ्यांची अवैध वाहतूक; प्रवाशांकडून संताप व्यक्त)

विशेष म्हणजे, ही मोहीम अमेरिकेत रहाणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनीच चालवली आहे. टाइम्स स्क्वेअरवर अशी टोकाची खिल्ली उडवण्यामागे देशातील लष्करी हस्तक्षेप, राजकीय अराजकता आणि इम्रान खान यांच्या अटकेविरोधातील संताप आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ केवळ पाकिस्तानपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर जागतिक माध्यमांमध्येही चर्चिला जात आहे. त्यामुळे ‘फ्रॉड मार्शल’ ही टीका ट्रेंडिंगमध्ये आली आहे. यातून केवळ उपरोधच नव्हे, तर पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवरील अविश्वास आणि विरोध जगासमोर आला आहे.

परदेशातील पाकिस्तानी नागरिकांच्या काही गटांनी मायदेशातील अलीकडील लष्करी आणि राजकीय घडामोडींवरून व्यक्त केलेल्या निराशेमुळे, जागतिक व्यासपीठावर मुनीर यांची ही सार्वजनिक नामुष्की मानली जात आहे.

टाईम्स स्क्वेयरवरील बिलबोर्डवर काय म्हटले आहे?

न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरवर एका ट्रकवर फिरणाऱ्या डिजिटल स्क्रीनवर खालील मुद्दे झळकले:
THE DECEIVER & HIS TWO CROOKS असीम मुनीर, झरदारी आणि नवाज शरीफ यांचे फोटो.
ILLEGALLY DETAINED FOR 2 YEARS – माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगातील फोटो.
FRAUD MARSHAL, LIAR – WHY DON’T YOU TAKE A POLL?
GOOD WORK MAKES YOU STAND TALL, NOT FAKE TITLES
REAL HERO STANDING WITH IMRAN KHAN

भारताविरूद्ध पराभवानंतरही पदोन्नती

6-7 मे 2025 रोजी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. यात लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, हिज्बुल मुजाहिदीन आणि टीआरएफ सारख्या संघटनांचे तळ उद्ध्वस्त केले गेले. 10 मे रोजी तडजोडीची भूमिका घेत पाकिस्तानने युद्धविरामाची भूमिका घेतली. पण या पराभवानंतरही पाकचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना ‘फिल्ड मार्शल’ ही पाकिस्तानमधील सर्वाधिक सन्मानाची, पण प्रातिनिधिक पदवी दिली गेली. यामुळे पाकिस्तानातीलच नव्हे, तर परदेशस्थ पाकिस्तानी नागरिकांमध्येही संताप निर्माण झाला आहे. अनेकांनी याला “अपयशासाठी सन्मान” असे म्हणत टीका केली.

परदेशी पाकिस्तान्यांची भूमिका

जगभर पसरलेले पाकिस्तानी (Pakistan) नागरिक, विशेषतः अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडातील पाकिस्तानी सोशल मीडियावर सक्रिय असून ते इम्रान खान यांना न्याय मिळावा यासाठी अनेक प्रकारे आंदोलन करत आहेत. असीम मुनीर, नवाज शरीफ आणि झरदारी या तिघांना “तीन भ्रष्ट राजकीय साठे” असे संबोधून, ही मंडळी स्वतःच्या हितासाठी देश विकण्यास तयार असल्याचा आरोप या मोहिमेद्वारे करण्यात आला आहे. असीम मुनीर यांच्यावरचे टीकेचे सत्र आता केवळ पाकिस्तानपुरते मर्यादित राहिले नसून आंतरराष्ट्रीय मंचांवरही पोहोचले आहे. (Fraud Marshal)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.