United Nations मध्ये पाकिस्तानी पत्रकारानेच नेत्याचे खोटे उघडे पाडले; काय आहे प्रकरण ?

96

मंगळवारी रात्री उशिरा संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations, यूएन) मुख्यालयात पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto) झरदारी यांचे खोटे जागीच पकडले. बिलावल यांनी आरोप केला की, भारत सरकार पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) वापर भारतातील मुस्लिमांना बदनाम करण्यासाठी राजकीय हेतूंसाठी करत आहे.

(हेही वाचा – Bengaluru Stampede : कुंभमध्येही ५०-६० जणांना जीव गमवावा लागला होता; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा निर्लज्जपणाचा कळस)

यावर एका पत्रकाराने सांगितले की, तुम्ही म्हणत आहात की, अलीकडच्या दहशतवादी हल्ल्याचा वापर भारतातील मुस्लिमांना बदनाम करण्यासाठी केला जात आहे, परंतु मी स्वतः भारतीय सैन्याचे ब्रीफिंग पाहिले आहे आणि त्यात फक्त मुस्लिम अधिकारीच उपस्थित होते.

प्रत्यक्षातही भारताकडून कर्नल सोफिया कुरेशी (Colonel Sophia Qureshi) ऑपरेशन सिंदूरशी (Operation Sindoor) संबंधित पत्रकार परिषद घेत होत्या.

दरम्यान, भारताप्रमाणेच पाकिस्ताननेही परदेशात आपले विचार मांडण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठवले आहे. या शिष्टमंडळात एकूण ९ सदस्य आहेत. त्याचे नेतृत्व माजी परराष्ट्र मंत्री आणि पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो झरदारी करत आहेत. हे शिष्टमंडळ न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डीसी, लंडन आणि ब्रुसेल्सला भेट देईल. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे विशेष सहाय्यक सय्यद तारिक फतेमी यांच्या नेतृत्वाखाली एक वेगळे शिष्टमंडळ रशियाला पोहोचले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.