रशिया – युक्रेन युद्धामध्ये (Russia-Ukraine War) युद्धविराम होण्यासाठी अमेरिका दबाव वाढवत आहे. त्या पार्श्वभूमीवर रशियाची रणनीती युक्रेनच्या जास्तीत जास्त भूभागावर ताबा मिळवण्याची आहे. अधिक भूभागावर ताबा मिळाल्यास चर्चेच्या टेबलावर रशियासाठी सौदेबाजी सोपी होईल. यासाठी गेल्या तीन आठवड्यांपासून रशियाने युक्रेनवर सतत मोठे हल्ले केले आहेत.
(हेही वाचा – देशात Corona चे सक्रिय रुग्ण ४८६६ वर ! गेल्या २४ तासांत ७ जणांचा मृत्यू)
रशियाचा महासत्ता दर्जा आता डगमगू लागला आहे. रविवारी युक्रेनने केलेल्या हल्ल्यांमध्ये पाच वायुसेना तळांवर आक्रमण झाले आणि बेलाया एअरबेसवर अणुहल्ला करण्यास सक्षम ४० हून अधिक बॉम्ब विमानांचे नुकसान झाले. यामुळे युद्ध आता ‘रेडलाइन’च्या जवळ पोहोचले आहे. तसेच रशियाच्या मोठ्या नौदल तळावरही हल्ल्याची शक्यता आहे, जिथे अणुहल्ल्यासाठी सक्षम पाणबुडी तैनात आहेत. त्यामुळे रशिया युक्रेनवर अणुहल्ला करू शकतो, असे संकेत मिळू लागले आहेत.
अमेरिकेच्या दोन सिनेटरनी रविवारी या प्रकारचे संकेत दिल्यानंतर, त्यांनी सोमवारी पॅरिसमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांची भेट घेतली. या बैठकीतही आगामी काळात युक्रेनमध्ये भीषण हल्ल्यांची शक्यता यावर सहमती व्यक्त करण्यात आली.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांच्याशी भेटीनंतर पॅरिसमध्ये अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर लिंडसे ग्राहम आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर रिचर्ड ब्लूमेन्थाल यांनी ‘अॅसोसिएटेड प्रेस’शी बोलताना मोठ्या युद्धाची शक्यता व्यक्त केली. दोघांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉनही त्यांच्या मताशी १०० टक्के सहमत आहेत.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अमेरिकेच्या (America) वाढत्या दबावामुळे रशिया युक्रेनच्या अधिकाधिक भागावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण यामुळे चर्चेच्या वेळी रशियाला अधिक ताकद मिळेल. मात्र, युक्रेनने केलेल्या पलटवाराने रशियाच्या रणनीतीला आणि त्याच्या अधिकाराला मोठा धक्का बसला आहे.
रशिया अणुशस्त्रांचा वापर करू शकतो – तज्ञ
या हल्ल्याच्या यशामुळे युक्रेनचाही आत्मविश्वास वाढला आहे आणि त्यामुळे युद्ध आणखी भयंकर होण्याची शक्यता वाढली आहे. जर युक्रेनने पुन्हा अशा प्रकारचा मोठा हल्ला केला, तर रशियासाठी ‘मोठे प्रतिउत्तर’ देणे टाळणे कठीण होईल. हे प्रतिउत्तर अणुशस्त्रांच्या वापराचे देखील असू शकते, कारण जगात सर्वाधिक अणुशस्त्रांचा साठा रशियाकडेच आहे.
सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी म्हटले की, त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, पुतिन मोठ्या युद्धाची तयारी करत आहेत. ही वेळ केवळ रशियासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी धोकादायक ठरू शकते. अलीकडे युरोपियन संघ आणि ब्रिटनकडून रशियावर लावण्यात आलेल्या नव्या निर्बंधांमुळे पुतिनवर दबाव वाढला आहे. जर अमेरिका देखील या निर्बंधांमध्ये सहभागी झाली, तर रशियाची अडचण वाढणार हे निश्चित आहे.
तर अमेरिका करेल कारवाई
युक्रेनमधील युद्ध संपले नाही, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रशियाकडून पेट्रोलियम उत्पादने खरेदी करणाऱ्या देशांवर निर्बंध लावण्याची धमकी दिली आहे. अशा स्थितीत भारत आणि चीनही या निर्बंधांच्या कक्षेत येऊ शकतात किंवा त्यांच्या आयातीवर ५०० टक्के कर लावला जाऊ शकतो.
अमेरिकेत यासंदर्भात विधेयक तयार झाले असून अमेरिकन संसदेमध्ये त्याला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगभरात तणाव वाढण्याची शक्यता आहे. सिनेटर ब्लूमेन्थालही या मताशी सहमत आहेत.
त्यांनी सांगितले की, “अमेरिका आणि पश्चिमी देशांकडून रशियावर लावण्यात येणारे निर्बंध रशियाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडवू शकतात. रशियन अर्थव्यवस्था केवळ देशांतर्गत मर्यादित राहील.” तर सिनेटर लिंडसे ग्राहम म्हणाले की, “त्यांच्या संपूर्ण संसदीय कारकिर्दीत त्यांनी याहून अधिक कठोर विधेयक पाहिलेले नाही.” (Russia-Ukraine War)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community