Paraguay च्या राष्ट्राध्यक्षांचे राजभवन येथे स्वागत; ड्रग्ज माफियांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी सहकार्याची व्यक्त केली अपेक्षा

भारताचा संरक्षणावरील खर्च अधिक पॅराग्वेच्या राष्ट्राध्यक्षांचे मत

99
पॅराग्वे राष्ट्रअध्यक्ष सँटियागो पेना पॅलासिओस (Santiago Peña Palacios) हे तीन दिवसीय भारतभेटीवर आले आहेत. दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (Governor C. P. Radhakrishnan) यांनी राज्य शासनाच्या वतीने बुधवारी (दि. ४ जून) राजभवन, मुंबई येथे स्वागत केले. तसेच जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उदयास आलेल्या भारताने आगामी काळात जागतिक पटलावर महत्त्वाची भूमिका बजावावी, अशी अपेक्षा राष्ट्राध्यक्ष सँटियागो  पेना यांनी यावेळी व्यक्त केली.  (Paraguay)

(हेही वाचा – Monsoon Session : २१ जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार; ‘ऑपरेशन सिंदूर’चा मुद्दा संसदेत गाजणार?)

भारतासह कृषी क्षेत्रात भागीदारी करण्याची इच्छा
भारत दौऱ्यात पाहिलेल्या प्रत्येक गोष्टींनी आपण प्रभावित झाल्याची भावना यावेळी अध्यक्ष  पेना यांनी व्यक्त केली.  पॅराग्वे दक्षिण अमेरिका खंडातील ‘अन्नधान्याचे कोठार’ म्हणून ओळखला जाते असे नमूद करून पेना यांनी भारतासोबत कृषी, नवीकरणीय ऊर्जा यांसह विविध क्षेत्रात भागीदारी करण्याची इच्छा व्यक्त केली.
ड्रग्ज माफियांचे रॅकेट संपविण्याचे आव्हान
पॅराग्वेची लोकसंख्या ६ दशलक्ष आहे परंतु आपला देश १० कोटी लोकांसाठी अन्नधान्य निर्माण करतो. पॅराग्वे १०० टक्के नवीकरणीय ऊर्जा वापरतो तसेच निर्मित ऊर्जेपैकी  ५० टक्के ऊर्जा निर्यात देखील करतो असे त्यांनी सांगितले. दक्षिण अमेरिका संघटित गुन्हेगारी तसेच ड्रग माफियांमुळे संत्रस्त असून ड्रग्ज माफियांचे आव्हान संपविण्यासाठी सर्व देशांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताशी व्यापार वाढवण्यासाठी प्रयत्न
पॅराग्वेच्या राष्ट्राध्यक्षांचे (Paraguay President) स्वागत करताना राज्यपालांनी पॅराग्वेने भारताशी व्यापार वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करावे असे सांगितले. पॅराग्वेने शेजारी राष्ट्रांशी उत्तम संबंध ठेवल्याबद्दल प्रशंसा करताना कुरापतखोर शेजारी लाभल्यामुळे भारताचा संरक्षणावरील खर्च अधिक होत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.  यावेळी पॅराग्वेचे परराष्ट्रमंत्री रुबेन रामिरेझ लेझकानो, पॅराग्वेचे भारतातील राजदूत फ्लेमिंग रॉल डुआर्टे रामोस, राष्ट्रीय संसद सदस्य नतालिसिओ चेस, खासदार मिगेल डेल पुएर्तो, अमांबाय प्रांताचे गव्हर्नर जुआन अकोस्टा आणि इतर प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीनंतर राज्यपालांनी पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष तसेच त्यांच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ स्नेहभोजन आयोजित केले होते.
(हेही वाचा – Drug Trafficking साठी ऑर्थो कंबरपट्ट्याचा वापर; विमानतळावरुन ५२ कोटींचे कोकेन जप्त)
राजभवनातील स्नेहभोजनात हे निमंत्रित उपस्थित  
स्नेहभोजनाला महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, महाराष्ट्र, गोवा व गुजरात प्रभागाचे मुख्य अधिकारी मेजर जनरल बिक्रमदीप सिंह, महाराष्ट्र नौदल प्रभागाचे ध्वज अधिकारी रिअर ऍडमिरल अनिल जग्गी तसेच इतर निमंत्रित उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.