-
प्रतिनिधी
अमली पदार्थ तस्करांकडून तस्करीसाठी ‘ऑर्थो कंबरपट्ट्या’चा वापर करण्यात आल्याचा प्रकार मुंबई विमानतळावर उघडकिस आला आहे. सिमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत एका परदेशी नागरिकाला अटक करून त्याच्याजवळील आढळून आलेल्या ऑर्थो कंबरपट्ट्यातून ५२ कोटींचे कोकेन हा अमली पदार्थ जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने ऑर्थो कमर बेल्ट आणि कॅल्फ सपोर्टर्समध्ये हे प्रतिबंधित पदार्थ लपवले होते. (Drug Trafficking)
(हेही वाचा – राज्यातील ९ लाख महिला घेत आहेत Government Schemes चा बेकायदेशीर लाभ)
सिमा शुल्कविभागाच्या हवाई गुप्तचर पथकाने (एआययू) मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका संशयित प्रवाशाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेण्यात आली. झडती दरम्यान अधिकऱ्यांना पांढरी पावडर असलेली चार पाकिटे सापडली. ही पाकीट प्रवाशाने त्याच्या ऑर्थो कंबरपट्ट्यात लपवून ठेवली होती. जप्त केलेल्या पावडर सदृष्य पदार्थाची नार्कोटिक्स फील्ड टेस्टिंग किट वापरून चाचणी केल्यानंतर, हे कोकेन असल्याचे आढळून आले, असे सीमाशुल्क अधिकाऱ्याने सांगितले. (Drug Trafficking)
(हेही वाचा – घुसखोरी विरोधात BSF ने उचलली कठोर पावले ! DRDO ची मदत घेणार)
दरम्यान अधिकाऱ्यांनी व्यक्तीकडून ५१.९४ कोटी रुपये किमतीचे सुमारे ५,१९४ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. त्यानंतर प्रवाशाला एनडीपीएस कायद्याच्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेली व्यक्ती आरोपींकडून परदेशी हँडलर्स आणि सहकाऱ्यांबद्दल तसेच स्थानिक संपर्कांबद्दल माहिती मिळविण्याचा सीमा शुल्क विभागाकडून प्रयत्न सुरू आहे. सीमाशुल्क अधिकारी परदेशी व्यक्तीचा प्रवास इतिहास देखील तपासत आहेत की त्याने यापूर्वी भारतात अमली पदार्थ किंवा इतर कोणत्याही प्रतिबंधित वस्तूंची तस्करी केली आहे का आणि वाहक म्हणून काम करण्याच्या बदल्यात प्रवाशाला किती रक्कम देण्यात आली होती हे देखील तपासत आहेत, असे सूत्रांनी सांगितले. (Drug Trafficking)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community