उद्धव-राज एकत्र आले तरी धक्का बसणार नाही, भाजपाचा BMC Elections ‘गेमप्लॅन’ तयार!

अंतर्गत सर्व्हेक्षणाचा निष्कर्ष

99
उद्धव-राज एकत्र आले तरी धक्का बसणार नाही, भाजपाचा BMC Elections ‘गेमप्लॅन’ तयार!
उद्धव-राज एकत्र आले तरी धक्का बसणार नाही, भाजपाचा BMC Elections ‘गेमप्लॅन’ तयार!

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Elections) भारतीय जनता पक्षाने (BJP) आपली तयारी झपाट्याने सुरू केली असून, पक्षाकडून अंतर्गत सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात भाजपाने मुंबईत मोठा भाऊ म्हणून आपली भूमिका स्पष्ट केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

मुंबईत भाजपा आघाडीवर – ‘मोठा भाऊ’ म्हणूनच निवडणूक लढवणार

सर्वेक्षणानुसार, सध्या मुंबई महापालिकेत भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक आहेत, त्यामुळेच पक्षाचे स्थान भक्कम आणि अग्रगण्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे भाजपाने आगामी निवडणुकीत मुंबईत वर्चस्व गाजवण्याची रणनीती आखली असून, १५० हून अधिक जागांवर उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे.

सर्वेक्षणानुसार, भाजपाने (BJP) जास्त जागांवर लढवले तरच पक्षाला निर्धारपूर्वक लाभ होईल, असा निष्कर्ष समोर आला आहे.

(हेही वाचा – अंतराळवीर Shubanshu Shukla 10 जूनला करणार अंतराळ मोहिमेसाठी उड्डाण)

ठाण्यात शिंदेंची बाजी – भाजपाची ‘छोटा भाऊ’ भूमिका

दरम्यान, ठाणे महापालिकेच्या संदर्भात भाजपाने वास्तववादी भूमिका घेतली आहे. सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचा (Shiv Sena) ठाणे शहरात अधिक प्रभाव आहे. त्यामुळे तिथे शिंदे गट ‘मोठा भाऊ’ आणि भाजपा ‘छोटा भाऊ’ अशी भूमिका घेईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज-उद्धव एकत्र आले तरी भाजपा अडचणीत येणार नाही – सर्व्हेचा निष्कर्ष

या अंतर्गत सर्वेक्षणात एक महत्त्वाचा मुद्दा उघड झाला आहे – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र आले, तरी भाजपाच्या जागांवर फारसा परिणाम होणार नाही. मराठी मतांची विभागणी भाजपाच्या हानीची कारणीभूत ठरणार नाही, अशी रणनीती पक्षाकडून आखली गेली आहे.

भाजपाने (BJP) आतापर्यंतच्या संघटनात्मक ताकदीवर, कार्यकर्त्यांच्या जमिनीवरच्या संपर्कावर आणि केंद्र व राज्यातील सत्ता हे दोन्ही हातात असल्याच्या फायद्यावर भर दिला आहे.

(हेही वाचा – Russia-Ukraine war : रशिया आणि क्रिमियाला जोडणाऱ्या युरोपमधील सर्वात मोठ्या पुलावर युक्रेनचा अंडरवॉटर हल्ला !)

सर्वेक्षणातून स्पष्ट संकेत – मुंबई जिंकण्यासाठी भाजपा सज्ज!

या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांमुळे भाजपामध्ये नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते लवकरच युतीच्या जागावाटपावर अंतिम निर्णय घेणार असून, मुंबईसाठी भाजपाचा प्रचार युद्धपातळीवर सुरू होणार असल्याचे संकेत आहेत.

एकूणच, राजकीय घडामोडींनी पुन्हा एकदा मुंबईतील वातावरण तापवले असून, भाजपाचा मुंबई महापालिकेवरील जोरदार दावा पुढील काळात कोणती समीकरणं घडवतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.