Russia-Ukraine war : रशिया आणि क्रिमियाला जोडणाऱ्या युरोपमधील सर्वात मोठ्या पुलावर युक्रेनचा अंडरवॉटर हल्ला !

Russia-Ukraine war : रशिया आणि क्रिमियाला जोडणाऱ्या युरोपमधील सर्वात मोठ्या पुलावर युक्रेनचा अंडरवॉटर हल्ला !

99

रशिया (Russia-Ukraine war) आणि क्रिमियाला जोडणाऱ्या युरोपमधील सर्वात मोठ्या पुलाला युक्रेनने पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. युक्रेनियन गुप्तचर संस्था एसबीयूने मंगळवारी दावा केला की, त्यांनी केर्च ब्रिजला पाण्याखालून १,१०० किलो (१.१ टन) स्फोटके लावून उडवले आहे. हा हल्ला सोमवारी पहाटे करण्यात आला. यामुळे पुलाच्या पाण्याखालील आधारस्तंभांना गंभीर नुकसान झाले. (Russia-Ukraine war)

व्लादिमीर पुतीन यांचा ड्रीम प्रोजेक्ट
एसबीयूने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, आम्ही २०२२ आणि २०२३ मध्येही या पुलावर हल्ला केला होता. एजन्सीने स्फोटाचा एक व्हिडिओ देखील जारी केला आहे, ज्यामध्ये पुलाच्या पिलरमध्ये मोठा स्फोट होताना दिसत आहे. केर्च ब्रिज हा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता, जो १९ किलोमीटर लांब असून रशियाला थेट क्रिमियाशी जोडतो. (Russia-Ukraine war)

युक्रेनचे १४०० हून अधिक सैनिक ठार
२०१४ मध्ये क्रिमियावर नियंत्रण मिळवल्यानंतर हा पूल रशियासाठी लष्करी आणि धोरणात्मक पुरवठा मार्ग म्हणून उदयास आला होता. आता या हल्ल्यानंतर रशियाला गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. गेल्या २४ तासांत युक्रेनचे १४०० हून अधिक सैनिक ठार केल्याचा दावा रशियाने केला आहे. ‘बॅटलग्रुप साउथ’मध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे, जिथे ७५० सैनिक ठार झाले आणि दहा चिलखती वाहने नष्ट केली. (Russia-Ukraine war)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.