Ayodhya नगरी सजली; राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा 5 जून रोजी

250
Ayodhya : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिर संकुलातील आठ मंदिरांमध्ये एकाच वेळी होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा विधीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. यासाठी राम मंदिर सजवण्याचे काम पूर्ण झाले आहे. मंदिराच्या मुख्य शिखर कलशावर सोन्याचा मुलामा चढवण्याचे काम पूर्ण झाले आहे. मंदिराचा वरचा भाग सोन्याच्या तेजामुळे अधिक आकर्षक झाला आहे, तर रात्रीच्या प्रकाशात त्याची चमक पाहण्यासारखी आहे. राम मंदिर संकुलातील ५ मंदिरांच्या शिखर कलशावर सोन्याचा मुलामा चढवण्याचे कामही पूर्ण झाले आहे. मंदिरांच्या प्राण प्रतिष्ठाचा विधी ३ जूनपासून सुरू झाली असून, ५ जूनपर्यंत सुरू राहील.  (Ayodhya)

(हेही वाचा – ST Bus : एसटी प्रवासात आता पुरुषांनाही मिळणार १० ते १५ टक्के सवलत)

तयारी पूर्ण झाली
राम मंदिर संकुलातील आठ मंदिरांमध्ये प्राण प्रतिष्ठा विधीची तयारी पूर्ण झाली आहे. हा कार्यक्रम ३ जूनपासून सुरू झाला असून, ५ जूनपर्यंत चालेल. परंतु याच्या एक दिवस आधी, २ जून रोजी, वैदिक मान्यतेनुसार, ४०० महिला शरयू किनाऱ्यावरून शरयू जल घेऊन कलश यात्रा पूर्ण झाली असून. त्यानंतर, ३ जूनपासून प्राण प्रतिष्ठाचे विधीवत पूजेला सुरुवात झाली आहे असे विधान मंदिराचे विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा (Dr. Anil Mishra) यांनी केले.
रामललाच्या प्राण प्रतिष्ठामध्ये डॉ. अनिल मिश्रा हे मुख्य यजमान आहेत. तसेच यावेळीही ते राम दरबारच्या प्राण प्रतिष्ठामध्ये ही भूमिका साकारणार आहेत. त्यांनी सांगितले की, सर्व विधी भगवान रामललाच्या प्राण प्रतिष्ठामध्ये ज्या पद्धतीने केले गेले त्याच पद्धतीने केले जातील, यावेळी फक्त मर्यादित संख्येने संत आणि पाहुणे सहभागी होतील.
मंदिरांमधील सजावट
मंदिरांच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमासाठी राम मंदिर पूर्णपणे सजवण्यात आले आहे. कडक उन्हामुळे, सर्व मंदिरांचे अंतर्गत भाग फुलांनी सजवण्यात आले आहे. तर बाहेरील भाग विद्युत रोषणाईने उजळवण्यात आला आहे.
मंदिराच्या कलशावर सोन्याचे जडण
राम मंदिराच्या मुख्य कलशासोबतच, परकोटाच्या ५ मंदिरांच्या कलशांवर सोन्याचा मुलामा देण्याचे काम पूर्ण झाले आहे. रात्रीच्या प्रकाशात त्यांची चमक आणखी वाढते.

(हेही वाचा – Sikkim Landslide: सिक्कीममध्ये भूस्खलन! ३ लष्करी जवान हुतात्मा, ९ जवान बेपत्ता )

३ जूनपासून विधी सुरू
राम मंदिर परिसरात असलेल्या मंदिरांमधील कार्यक्रमाबाबत सचिव चंपत राय म्हणाले की, प्राण प्रतिष्ठा अनुष्ठानचे कार्यक्रम ३ जूनपासून सुरू होऊन ५ जूनपर्यंत चालतील. यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.