Sharmishtha Panoli : शर्मिष्ठा पानोली(Sharmishtha Panoli)च्या अटकेनंतर पश्चिम बंगालमधील ममता सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यातच आता बॉलीवूड अभिनेत्री व भाजपा खासदार कंगना राणौतने ममता सरकारला फटकारले आहे. पश्चिम बंगालला उत्तर कोरिया बनवू नका, अशा शब्दांत पश्चिम बंगालमधील ममता सरकारवर संताप व्यक्त केला आहे. माफी मागितल्यानंतरही कायद्याचा गैरवापर करून एखाद्याला त्रास देणे, त्याचे करिअर उद्ध्वस्त करणे चुकीचे आहे, असेही त्या म्हणाल्या.(Sharmishtha Panoli)
(हेही वाचा Uttar Pradesh : गाझियाबादमध्ये ईदच्या दिवशी गोहत्या थांबवण्यासाठी आमदाराने उठविला आवाज, थेट डीसीपींना लिहिले पत्र )
दरम्यान, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि कायद्याच्या विद्यार्थिनी शर्मिष्ठा पानोली(Sharmishtha Panoli)ने पैगंबर मुहम्मदबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली होती. तिच्या या टिप्पणीवरून बराच वाद निर्माण झाला होता. त्यानंतर शर्मिष्ठाने तिच्या विधानाबद्दल माफी मागत ती व्हिडिओ पोस्ट डिलीटदेखील केली होती. परिणामी, कोलकाता पोलिसांनी शर्मिष्ठा(Sharmishtha Panoli)विरुद्ध गुन्हा दाखल करून तिला गुरुग्राममधून अटक केल्याने वाद आणखी चिघळला.
बंगालला उत्तर कोरिया बनवू नका – कंगना राणौत
शर्मिष्ठा पानोली(Sharmishtha Panoli)च्या समर्थनार्थ भाजप खासदार कंगना राणौत यांनी तिच्या अटकेला चुकीचे म्हटले आहे. कायद्याचा वापर करून एखाद्याला त्रास देणे योग्य नसून शर्मिष्ठाने तिच्या अपशब्दाबद्दल माफी मागितली आहे आणि ती पोस्टदेखील डिलीट केली आहे, असे भाजपा खासदार कंगना रानौत म्हणाल्या. तसेच, कंगना राणौतने कोलकाता पोलिसांनी शर्मिष्ठा(Sharmishtha Panoli)ला केलेली अटक चुकीची असल्याचे सांगतानाच राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालला उत्तर कोरिया बनवू नका, अशी टीकादेखील यावेळी केली.
खासदार कंगना रानौत यांचे ममता बॅनर्जींना आवाहन
भाजप खासदार कंगना राणौत यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना याप्रकरणी आवाहन केले. त्या म्हणाल्या, शर्मिष्ठा(Sharmishtha Panoli)ला सोडण्याची मागणी करताना तिचे करिअर महत्त्वाचे असून ते उदध्वस्त होऊ देऊ नका. आजची तरुण पिढी अशाच प्रकारे बोलते. काही इंग्रजीत बोलतात तर काही हिंदीत बोलतात. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना शर्मिष्ठाvची लवकरात लवकर सुटका करण्याचे आवाहनही खासदार कंगना रानौत यांनी यावेळी केले.(Sharmishtha Panoli)