द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) सप्टेंबर २०२५ मध्ये होणाऱ्या सनदी लेखापाल (सीए) परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ५ जुलैपासून सुरू होणार आहे.
उमेदवारांना विलंब शुल्काशिवाय अर्ज भरण्याची अंतिम तारीख १८ जुलै २०२५ आहे, तर विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम मुदत २१ जुलै आहे. परीक्षा केंद्र किंवा माध्यमात बदल करायचा असल्यास, २२ ते २४ जुलैदरम्यान अर्जात आवश्यक दुरुस्ती करता येणार आहे. (ICAI)
परीक्षा ३ ते २२ सप्टेंबरदरम्यान घेतल्या जाणार असून, ५ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादच्या सार्वजनिक सुट्टीमुळे परीक्षा होणार नाही. मात्र, इतर कोणत्याही सुट्टीमुळे परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केला जाणार नाही, असे ICAI ने स्पष्ट केले आहे. (ICAI)
(हेही वाचा – Vaishnavi Hagawane Case : तशी तर मी मोठ्या घरची राणी…; फॉर्च्यूनर गाडीवरील मजकुराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा)
CA परीक्षा वेळापत्रक सप्टेंबर २०२५
सीए अंतिम परीक्षा (Final)
गट १ : ३, ६ व ८ सप्टेंबर
गट २ : १०, १२ व १४ सप्टेंबर
सीए इंटरमिजिएट परीक्षा (Intermediate)
गट १ : ४, ७ व ९ सप्टेंबर
गट २ : ११, १३ व १५ सप्टेंबर
सीए फाउंडेशन परीक्षा (Foundation)
तारीखा : १६, १८, २० व २२ सप्टेंबर
(हेही वाचा – What is Diamond Duck : क्रिकेटमध्ये डायमंड डक म्हणजे काय?)
परीक्षेच्या वेळा
- फाउंडेशन पेपर १ व २ : दुपारी २ ते ५
- फाउंडेशन पेपर ३ व ४ : दुपारी २ ते ४
- सर्व इंटरमिजिएट पेपर्स : दुपारी २ ते ५
- अंतिम पेपर १ ते ५ : दुपारी २ ते ५
- अंतिम पेपर ६ : दुपारी २ ते ६
हेही पहा –
Join Our WhatsApp Community