
-
प्रतिनिधी
‘स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) या संघटनेचा गड असलेल्या तसेच ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ अर्थात ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेचे महाराष्ट्रातील मुख्य कार्यालय असणाऱ्या भिवंडी येथील पडघा बोरिवली गावात सोमवारी पहाटे ४ वाजता महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथका(ATS)ने ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने येथील २२ ठिकाणी शोधमोहीम राबवून १२ जणांना चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे. तब्बल ९ तास सुरू असलेल्या या शोधमोहिमेदरम्यान एटीएसच्या हाती काही आक्षेपार्ह दस्तावेज आणि हत्यारे मिळून आली आहे. ताब्यात घेण्यात आलेले संशयित हे साकीब नाचन याचे कट्टर समर्थक असून त्यांच्याकडून महाराष्ट्रात घातपाताची शक्यता असल्याचा संशय एटीएसने व्यक्त केला आहे. (NIA)
डिसेंबर २०२३ मध्ये राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए), महाराष्ट्र एटीएस तसेच स्थानिक पोलिसांनी महाराष्ट्रातील ४४ ठिकाणी छापेमारी करून ठाणे जिल्ह्यातील पडघा बोरिवली येथून सिमी या संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता साकीब नाचन यासह १५ जणांना अटक करून ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ अर्थात ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेचे महाराष्ट्र मॉड्युल उद्ध्वस्त करण्यात आले होते. एनआयएच्या अटकेत असलेला संशयित अतिरेकी साकीब नाचन आणि इतर साथीदार हे पडघा बोरिवली येथे राहणारे आहेत. (NIA)
(हेही वाचा – IPL 2025 Final, RCB vs PBKS : बंगळुरू फ्रँचाईजीने जिंकू नये असं इंग्लंडच्या ‘या’ माजी खेळाडूंना का वाटतं?)
देशात बंदी असलेल्या सिमी या संघटनेचा सक्रिय सदस्य आणि संशयित दहशतवादी साकीब अब्दुल हमिद नाचन आणि अटकेत असलेल्या त्याच्या हस्तकांनी पडघा बोरिवली येथे भडकाऊ व चिथावणीखोर भाषणे करून लोकांना देशाविरुद्ध कारवायां करण्यासाठी प्रेरित केलेले आहे. त्यामुळे पडघा – बोरिवलीत नाचनचे कट्टर समर्थक सक्रिय झाले आहे. त्यामुळे ते देशाच्या विरोधात कट कारस्थान करुन घातपाती कारवाई करण्याची शक्यता असल्याबाबतची खात्रीशीर गोपनीय माहिती एटीएसच्या (ATS) प्राप्त झाली होती. या पार्श्वभूमीच्या आधारे पोलीस निरीक्षक दहशतवाद विरोधी पथक, ठाणे यांनी न्यायालयाकडून, पडघा परिसरातील संशयित इसमांच्या घरच्या झडतीकरीता सर्च वॉरंट प्राप्त करुन घेतले. (NIA)
महाराष्ट्र एटीएस (ATS) पथकाने ठाणे ग्रामीण पोलिसांची मदत घेऊन सोमवारी पहाटे चार वाजता पडघा बोरिवलीमधील २२ घरांमध्ये शोधमोहीम राबवून १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवारी दुपारी १ वाजता ही शोधमोहीम थांबविण्यात आली. या शोधमोहिमेदरम्यान एटीएसने मोबाईल हॅन्डसेट्स, तलवार, सुरा, मालमत्तेबाबतची संशयास्पद कागदपत्रे व दहशतवाद, रॅडीक्लायझेशन यास उत्तेजन देणारी आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहे. एटीएस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, साकीब नाचन आणि त्याच्या समर्थकांना अटक केल्यानंतर नाचनच्या प्रक्षोभक भाषणातून प्रेरित झालेल्या व नाचन आणि इतराच्या संपर्कात असलेल्या २२ जणांकडून राज्यात घातापाताची शक्यता होती. त्यामुळे हे छापेमारी करून १२ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. (NIA)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community