State Government : येत्या ८ दिवसांत एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका सादर होणार; सरकारचं ऐतिहासिक पाऊल की राजकीय खेळी?

58
ST Bus : एसटी प्रवासात आता पुरुषांनाही मिळणार १० ते १५ टक्के सवलत
  • प्रतिनिधी

राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा कणा असलेल्या एसटी महामंडळाच्या श्वेतपत्रिकेचा पहिल्यांदाच उच्चार झाला असून, येत्या आठ दिवसांत ती अधिकृतपणे सादर होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे स्वतः ही श्वेतपत्रिका सादर करणार असल्याचे जाहीर करताच, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एसटी महामंडळाच्या आर्थिक आणि प्रशासकीय कारभाराचा लेखाजोखा मांडणाऱ्या या श्वेतपत्रिकेमागे नेमके राजकीय संकेत काय आहेत?, हा चर्चेचा प्रमुख विषय ठरू लागला आहे. (State Government)

श्वेतपत्रिका म्हणजे काय आणि का?

सामान्यतः श्वेतपत्रिका ही एखाद्या संस्थेच्या कामकाजावर सखोल प्रकाश टाकणारा दस्तऐवज असतो. यामध्ये आर्थिक व्यवहार, धोरणात्मक निर्णय, यशापयशाचे विश्लेषण, वादग्रस्त मुद्दे आणि भविष्यातील दिशा यांचा समावेश असतो. एसटी महामंडळाच्या संदर्भात, गेल्या काही वर्षांत झालेली आर्थिक पडझड, कर्मचारी आंदोलने, डिझेल दरवाढ, तिकीट दरातील बदल, वाहन खरेदी प्रक्रिया, आणि खासगीकरणाच्या चर्चा यासारखे मुद्दे या श्वेतपत्रिकेत सामावले जाण्याची शक्यता आहे. (State Government)

(हेही वाचा – Viral Video : “गांधी परिवारातील सगळेच २४x७ राजकारणात होते, पण तुम्ही…”; गुलाम नबी आझाद यांचा व्हिडिओ व्हायरल)

प्रताप सरनाईकांचा दावा : “पारदर्शकता आणण्यासाठी पाऊल”

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी श्वेतपत्रिकेची घोषणा करताना स्पष्ट केलं की, “एसटी महामंडळाच्या कारभारात पारदर्शकता यावी, जनतेला वस्तुस्थिती समजावी आणि चुकीचे आरोप बाजूला व्हावेत यासाठी ही श्वेतपत्रिका आवश्यक आहे.” त्यांनी सूचकपणे हेही सांगितले की, “पूर्वीच्या सरकारांच्या कारभारातील काही तथ्ये यामध्ये मांडली जातील.” (State Government)

श्वेतपत्रिकेमागचं राजकारण काय?

राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही श्वेतपत्रिका काढून सत्ताधारी सरकार “पूर्वसत्ताधाऱ्यांवर जबाबदारी टाकू पाहत आहे”. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती ढासळण्यामागे कोण जबाबदार, याचा ठपका लावण्याचा प्रयत्न या श्वेतपत्रिकेतून केला जाऊ शकतो. विशेषतः महाविकास आघाडी सरकारच्या काळातील निर्णयांची चिकित्सा होणार, अशी चर्चा आहे. (State Government)

(हेही वाचा – IPL 2025, PBKS in Final : ‘कोलकात्याने श्रेयसला सोडून चूक केली,’ – अंजुम चोप्रा)

कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता, पण भीतीही

एसटी महामंडळाचे हजारो कर्मचारी आणि अधिकारी या श्वेतपत्रिकेकडे उत्सुकतेने पाहत आहेत. अनेक वर्षांपासूनच्या वेतनवाढ, थकीत वेतन, पेन्शन योजना, भरती प्रक्रिया या सर्व गोष्टींचा उलगडा यातून होईल का, याची प्रतीक्षा आहे. मात्र, काही संघटनांना भीती वाटते की, या दस्तऐवजातून कर्मचाऱ्यांवर दोषारोप नकोत. (State Government)

पहिल्यांदाच एसटीसाठी श्वेतपत्रिका – ऐतिहासिक पाऊल की राजकीय खेळी?

एसटी महामंडळाच्या ७० वर्षांच्या इतिहासात प्रथमच श्वेतपत्रिका काढली जाणार आहे. ही गोष्ट ऐतिहासिक मानली जात असली, तरी तिच्या वेळेचा, हेतूचा आणि मजकुराचा राजकीय अर्थ लावला जात आहे. (State Government)

(हेही वाचा – Pakistan Fake Report : भारत-रशिया मैत्रीत फूट पाडण्याचा प्रयत्न फेल; पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड)

आता सर्वांच्या नजरा या दस्तऐवजावर!

शेतकरी, कर्मचारी, प्रवासी, विरोधी पक्ष आणि माध्यमं – सर्वच घटकांची नजर आता आगामी आठवड्यात सादर होणाऱ्या या श्वेतपत्रिकेवर खिळली आहे. एसटी महामंडळाचे नेमके सत्य काय आहे, आणि या श्वेतपत्रिकेमुळे कोणाचे ‘गाडे’ अडकणार आहेत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (State Government)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.