
-
प्रतिनिधी
विदर्भासारख्या दुर्गम भागातील सिकल सेल आणि थायलेसिमिया ग्रस्त रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळावेत, यासाठी आता नागपूरच्या एम्स रुग्णालयात बोन मॅरो ट्रान्सप्लांट (BMT) युनिट स्थापन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या दूरदृष्टीतून साकार झालेल्या या उपक्रमाला देशातील अग्रगण्य ऊर्जा कंपनी एनटीपीसीने सामाजिक दायित्व निधीतून (CSR) अर्थसहाय्य जाहीर करून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
एम्स नागपूर आणि एनटीपीसी यांच्यात सामंजस्य करार
या प्रकल्पासाठी एम्स नागपूर आणि एनटीपीसी यांच्यात अधिकृत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून, या अंतर्गत एनटीपीसीकडून एमआयएचएएन, नागपूर येथील एम्स परिसरात बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटची उभारणी केली जाणार आहे. रुग्णांसाठी अत्यावश्यक वैद्यकीय तपासण्या, औषधे, प्रत्यारोपणाची संपूर्ण प्रक्रिया, तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा यांचा खर्च एनटीपीसीच्या निधीतून केला जाणार आहे.
(हेही वाचा – IPL 2025, PBKS in Final : ‘कोलकात्याने श्रेयसला सोडून चूक केली,’ – अंजुम चोप्रा)
मुख्यमंत्र्यांकडून आभार – ग्रामीण व आदिवासी भागासाठी जीवनदायी ठरणार केंद्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी एनटीपीसीच्या या योगदानाबद्दल कंपनीचे आभार मानत सांगितले, “हे केंद्र केवळ नागपूरसाठी नाही, तर संपूर्ण मध्य भारतातील गरजू रुग्णांसाठी, विशेषतः लहान मुले, आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांसाठी आशेचा किरण ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिकल सेल आणि आनुवंशिक आजारांचे उच्चाटन हे राष्ट्रीय उद्दिष्ट ठरवले असून, हे केंद्र त्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”
प्रकल्पाची वैशिष्ट्ये – उपचार सोपे, प्रभावी आणि नजीकच
- स्थान : एमआयएचएएन, नागपूर
- सेवा : बोन मॅरो प्रत्यारोपणासाठी आवश्यक वैद्यकीय तपासण्या, औषधोपचार, तज्ज्ञ सेवा
- आकर्षण : गरजू रुग्णांसाठी संपूर्ण खर्च CSR अंतर्गत
- ओळख : युनिटमध्ये एनटीपीसीचा लोगो व CSR योगदानाचा स्पष्ट उल्लेख
एनटीपीसीचा सामाजिक भान – आरोग्य सेवेत आणखी एक पाऊल
एनटीपीसी मोण्डा ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रात सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत कार्यरत असून, शासकीय वैद्यकीय संस्थेसोबत भागीदारी करून उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.
(हेही वाचा – Viral Video : “गांधी परिवारातील सगळेच २४x७ राजकारणात होते, पण तुम्ही…”; गुलाम नबी आझाद यांचा व्हिडिओ व्हायरल)
दिल्ली-मुंबईच्या दौऱ्यांना पूर्णविराम!
एम्स नागपूरमधील या युनिटमुळे विदर्भातील रुग्णांना आता ब्लड कॅन्सर, सिकल सेल आणि थायलेसिमिया यांसारख्या गंभीर आजारांवरील उपचारासाठी दिल्ली किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये धावपळ करावी लागणार नाही. नागपूरमध्येच आधुनिक सुविधा आणि अनुभवी डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार मिळणार आहेत.
जीवन वाचवणारा प्रकल्प, भविष्य घडवणारा पुढाकार!
हा प्रकल्प केवळ वैद्यकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा नसून, तो विदर्भातील आरोग्यसेवा क्षेत्रातील एक मैलाचा दगड ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची कल्पकता आणि एनटीपीसीची सामाजिक बांधिलकी एकत्र येऊन समाजासाठी प्रभावी आरोग्य सुविधा उभ्या राहत आहेत. ज्यामुळे हजारो कुटुंबांचे जीवन पालटू शकते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community