India A vs England Lions : टॉम हेन्स, मॅक्स होल्डन यांच्या शतकामुळे इंग्लंड लायन्सचं भारताला दमदार उत्तर

India A vs England Lions : इंग्लंड लायन्सने पहिल्या डावांत ७ बाद ५२७ धावा केल्या आहेत. 

53
India A vs England Lions : टॉम हेन्स, मॅक्स होल्डन यांच्या शतकामुळे इंग्लंड लायन्सचं भारताला दमदार उत्तर
  • ऋजुता लुकतुके

भारतीय ए संघ आणि इंग्लंड लायन्स संघादरम्यान सुरू असलेल्या अनधिकृत कसोटींत लायन्स संघाने भारताच्या ५५७ धावांना जोरदार प्रत्त्युत्तर दिलं आहे. सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी इंग्लंड लायन्सनी ७ बाद ५२७ धावा केल्या आहेत. मुकेश कुमारचा अपवाद सोडला तर इतर गोलंदाजांच्या मर्यादा या सामन्यात स्पष्ट झाल्या. हर्षित राणा, शार्दूल ठाकूर, नितिश कुमार रेड्डी आणि हर्ष दुबे या प्रत्येकाने ५ पेक्षा जास्त धावगतीने धाव्या दिल्या. (India A vs England Lions)

बेन मॅककिनीला अंशुल कंबोजने १६ धावांत त्रिफळाचित केलं. सत्र संपता संपता एमिलिओ गे ४६ धावा करून बाद झाला. हे दोन अपवाद वगळता उर्वरित दोन सत्रांवर पूर्णपणे इंग्लंड लायन्स संघाचं वर्चस्व राहिलं. टॉम हेन्सने आधी गे आणि त्यानंतर मॅक्स होल्डन यांच्याबरोबर शतकी भागिदारी रचली. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डॅन म्युसलीनेही ११३ धावा केल्या. या तीन शतकांमुळे इंग्लंड लायन्सनी आरामात ५०० धावांचा टप्पा तो ही एकाच दिवसांत पार केला. अखेर टॉम हेन्सला ठाकूरने १७२ धावांवर बाद केलं. (India A vs England Lions)

(हेही वाचा – Air India Planes आता दुरुस्तीसाठी तुर्कीला जाणार नाहीत; Operation Sindoor नंतर पाकला मदत करणे भोवले)

भारताकडून मुकेश कुमारने ७५ धावांत ३ बळी मिळवले. तर कंबोज, ठाकूर, दुबे आणि करुण नायर यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. एरवी कसोटी क्रिकेटमध्ये ४९ क्रमांकाची जर्सी घालून खेळणारा मुकेश कुमार या सामन्यात १८ क्रमांकाची जर्सी घालून खेळला. हा क्रमांक विराट कोहलीकडे होता. विराट कोहलीने अर्थातच काही दिवसांपूर्वी कसोटीतून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यानंतर मुकेशने १८ क्रमांकाची जर्सी घातल्यामुळे या गोष्टीची दिवसभर चर्चा होत राहिली. (India A vs England Lions)

या अनधिकृत कसोटीचे अजून दोन दिवस बाकी आहेत आणि सध्या इंग्लंड लायन्स संघ ३० धावांनी पिछाडीवर आहे. इंग्लंड दौऱ्याच्या तयारीच्या दृष्टीने भारताने या अनधिकृत कसोटीला महत्त्व दिलं आहे. राष्ट्रीय संघातील एकूण ६ खेळाडू या सामन्यात खेळवले आहेत. (India A vs England Lions)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.