ऋजुता लुकतुके
भारताचा नवनिर्वाचित कसोटी कर्णधार शुभमन गिल इंग्लंड दौऱ्यातील (India’s Tour of England) दुसऱ्या सराव सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. भारतीय अ संघ ३० मे पासून इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध दोन ४ दिवसीय सामने खेळणार आहे. आणि सरावाचा भाग म्हणून ६ जूनच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघातील काही खेळाडू खेळतील असा अंदाज आधी वर्तवला जात होता. आणि त्यात शुभमन गिलचंही नाव होतं. पण, सध्या गिल आयपीएलमध्ये व्यस्त आहे. तो गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व करत आहे. आणि ही फ्रँचाईजी अंतिम फेरीत पोहोचली तर ३ जूनपर्यंत तो व्यस्त असणार आहे. अशावेळी दोनच दिवसांत इंग्लंडमध्ये पोहोचून तिथे सराव सामना खेळणं कठीण आहे. (India’s Tour of England)
हेही वाचा-Elon Musk यांचा कार्यकाळ संपला, Donald Trump यांची सोडली साथ
हे लक्षात घेता बीसीसीआयने गिलला विश्रांती देण्याचं ठरवलं आहे. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राने या आशयाची बातमी केली आहे. ‘दुसरा सराव सामना नॉर्दम्पटन इथं ६ जूनपासून होणार आहे. आणि आयपीएलमधून गिल ३ तारखेपर्यंत मोकळा होणार नाही. अशावेळी त्याची धावपळ होऊ नये असं बीसीसीआयला वाटतं. त्यासाठीच त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितलं आहे. (India’s Tour of England)
हेही वाचा- Bihar-Nepal Border वर ‘नो मॅन्स लँड’चे व्हिडीओ काढताना दोन चिनी तरुणांना अटक
शुभमन गिलकडे पहिल्यांदाच कसोटी संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. खेळाडू म्हणून आणि कर्णधार म्हणूनही तो कशी कामगिरी करतो आणि मैदानावर काय रणनीती आखतो यावर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. २० जूनला हेडिंग्ले इथं भारत आणि इंग्लंड दरम्यानची पहिली कसोटी सुरू होणार आहे. विराट कोहली आणि रोहीत शर्मा यांनी कसोटीतून निवृत्ती स्वीकारल्यानंतर भारतीय संघासाठी हा पहिलाच कसोटी दौरा आहे. या दोघांऐवजी संघात करुण नायर आणि साई सुदर्शन यांना स्थान मिळालं आहे. तर करुण नायरनेही संघात पुनरागमन केलं आहे. संघात के एल राहुल हा एकमेव अनुभवी फलंदाज आहे. आणि तो चौथ्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे. (India’s Tour of England)
गोलंदाजीत जसप्रीत बुमराला महम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, अर्शदीप सिंग, आकाशदीप सिंग आणि शार्दूल ठाकूर यांची साथ मिळणार आहे. कुलदीप यादव हा एकमेव फिरकीपटू संघात आहे. (India’s Tour of England)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community