Donald Trump यांच्या ‘टॅरिफ वॉर’ला अमेरिकन कोर्टाकडून स्थगिती !

Donald Trump यांच्या 'टॅरिफ वॉर'ला अमेरिकन कोर्टाकडून स्थगिती !

81
Donald Trump यांच्या 'टॅरिफ वॉर'ला अमेरिकन कोर्टाकडून स्थगिती !
Donald Trump यांच्या 'टॅरिफ वॉर'ला अमेरिकन कोर्टाकडून स्थगिती !

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी जगभरातल्या देशांवर वेगवेगळ्या प्रमाणात टॅरिफ लागू केलं. त्यामुळे अनेक देशांशी अमेरिकेचे संबंध तणावपूर्ण झाले. चीनवर तर जवळपास २०० टक्क्यांहून अधिक टॅरिफ लागू करेपर्यंत हे संबंध ताणले गेले होते. अमेरिकन नागरिकांचं आयुष्य अधिक सुखकर करण्यासाठी हे करत असल्याचा दावा ट्रम्प (Donald Trump) यांनी केला होता. पण आता त्यांना ‘यूएस कोर्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड’नं फटकारलं असून त्यांच्या टॅरिफ निर्णयाला स्थगिती दिली आहे. (Donald Trump)

हेही वाचा-Bihar-Nepal Border वर ‘नो मॅन्स लँड’चे व्हिडीओ काढताना दोन चिनी तरुणांना अटक

अमेरिकन कोर्टानं दिलेल्या या निर्णयामुळे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे. खुद्द ट्रम्प यांनी अनेकदा आक्रमक भूमिका घेत टॅरिफ निर्णयाचं समर्थन केलं होतं. त्यांच्या या निर्णयावर जगभरातील अनेक देशांनी आक्षेप देखील घेतले होते. पण ट्रम्प टॅरिफ लागू करण्याच्या निर्णयापासून माघार घ्यायला तयार नव्हते. आता खुद्द अमेरिकेतल्याच न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे त्यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

हेही वाचा- Ashadhi Wari 2025 : आषाढी वारीत व्हीआयपी गाड्यांना नो एंट्री, टोलमध्ये सवलत मिळणार !

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ लागू करण्याच्या निर्णयावर ताशेरे ओढताना अमेरिकन न्यायालयाने हे घटनाविरोधी कृत्य ठरवलं. “जगभरात समन्यायी तत्व सांगत जारी करण्यात आलेले टॅरिफ लागू करण्याबाबतचे आदेश हे राष्ट्राध्यक्षांना देण्यात आलेल्या अधिकारांचं उल्लंघन आहे. अमेरिकेतील आयात नियंत्रित करण्यासाठी टॅरिफचा वापर करणं हे घटनेनं त्यांना दिलेल्या अधिकारांचं उल्लंघन आहे”, असं न्यायालयाने आपल्या निकालपत्रात नमूद केलं आहे. (Donald Trump)

हेही वाचा- Mock drill : २९ मे रोजी सीमावर्ती राज्यांमध्ये होणारे मॉक ड्रिल पुढे ढकलले !

डोनाल्ड ट्रम्प यांनी घटनेनं त्यांना दिलेल्या अधिकारांच्या कक्षा ओलांडून इंटरनॅशनल इमर्जन्सी इकोनॉमिक पॉवर्स अॅक्ट अर्थात IEEPA चा वापर केल्याचं न्यायालयाने नमूद केलं आहे. व्हाईट हाऊसचं वर्तन कायद्याच्या विरुद्ध जाणारं आहे, अशा शब्दांत न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. (Donald Trump)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.