Elon Musk यांचा कार्यकाळ संपला, Donald Trump यांची सोडली साथ

Elon Musk यांचा कार्यकाळ संपला, Donald Trump यांची सोडली साथ

102
Elon Musk यांचा कार्यकाळ संपला, Donald Trump यांची सोडली साथ
Elon Musk यांचा कार्यकाळ संपला, Donald Trump यांची सोडली साथ

अमेरिकन अब्जाधीश एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्रम्प प्रशासन सोडले आहे. मस्क यांनी 29 मे रोजी एक्स वर पोस्ट करत ट्रम्प प्रशासनाचा सल्लागार म्हणून कार्यकाळ संपला आहे, असे सांगितले आहे. अलिकडेच मस्क (Elon Musk) यांनी ट्रम्पच्या एका विधेयकाचा निषेध केला, ज्याचे वर्णन ट्रम्प यांनी स्वतः एक अतिशय सुंदर विधेयक म्हणून केले होते. या विधेयकात कर कपातीसारख्या तरतुदींचा समावेश आहे. सीबीएस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत मस्क यांनी ते अनावश्यक खर्च वाढवणारे विधेयक म्हणून वर्णन केले. (Elon Musk)

हेही वाचा-Maharashtra Rain : राज्यात मुसळधार पावसाचे 21 बळी, 22 प्राणी दगावले ; आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे माहिती जाहीर

ट्रम्प प्रशासनातील सरकारी खर्च कमी करण्यासाठी आणि नोकरशाही कमी करण्यासाठी स्थापन केलेल्या सरकारी कार्यक्षमता विभागाच्या (DOGE) प्रमुखाची जबाबदारी मस्क यांना देण्यात आली होती. मात्र, त्यांना दिलेल्या जबाबदारीपासूनच अमेरिकन जनतेमध्ये संतापाची लाट पसरली होती. अमेरिकेतील सर्व राज्यांमध्ये मोर्चे काढण्यात आले होते. मस्क यांनी या जबाबदारीबद्दल अध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर मस्क यांच्या राजीनाम्याची पुष्टी केली. (Elon Musk)

हेही वाचा- Mock drill : २९ मे रोजी सीमावर्ती राज्यांमध्ये होणारे मॉक ड्रिल पुढे ढकलले !

नोव्हेंबर 2024 मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर, डोनाल्ड ट्रम्प यांनी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DoGE) नावाचा एक नवीन विभाग तयार करण्याची घोषणा केली. सरकारला बाहेरून सल्ला देण्यासाठी तो तयार करण्यात आला. ट्रम्प यांनी त्याची कमान एलोन मस्क आणि भारतीय वंशाचे उद्योगपती विवेक रामास्वामी यांच्याकडे सोपवली. नंतर विवेक रामास्वामी यांना त्यातून काढून टाकण्यात आले. (Elon Musk)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.