Ashtavinayak Temples चा होणार जीर्णोद्धार; नियोजन विभागाकडून १४८ कोटी खर्चास मान्यता

64
Ashtavinayak Temples चा होणार जीर्णोद्धार; नियोजन विभागाकडून १४८ कोटी खर्चास मान्यता
  • प्रतिनिधी

देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राज्यातील अष्टविनायक मंदिरांच्या (Ashtavinayak Temples) जीर्णोद्धाराच्या मार्ग मोकळा झाला आहे. वित्त आणि नियोजन विभागाने १४७ कोटी ८१ लाख रुपये खर्चाच्या ‘अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोद्धार आणि विकास आराखड्या’स सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून त्यासंबंधीचा शासन निर्णय बुधवारी जारी करण्यात आला आहे. या निर्णयात लेण्याद्री गिरिजात्मज मंदिराचा समावेश नाही.

अष्टविनायक विकास आराखड्यामुळे अष्टविनायक मंदिरांचा (Ashtavinayak Temples) जीर्णोद्धार तसेच परिसराचा विकास होणार असून देवस्थानांना भेट देणाऱ्या भाविकांना, पर्यटकांना पायाभूत, नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत. अष्टविनायक क्षेत्रांच्या विकासामुळे राज्यातील आध्यात्मिक पर्यटनाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

(हेही वाचा – Operation Sindoor अजून एक आठवडा सुरू असते तर…; बलूच नेत्याचे पंतप्रधान मोदींना पत्र)

अष्टविनायक मंदिरांचा (Ashtavinayak Temples) जीर्णोद्धार आणि विकास आराखड्यास गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे यासंबधीच्या प्रस्तावाला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या माध्यमातून ६ मे २०२५ रोजी चौंडी (जि. अहिल्यानगर) येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता घेण्यात आली. अष्टविनायक मंदिर विकासाचा आराखडा २०२१- २२ मध्ये तयार करण्यात आला होता. त्यावेळी तो आराखडा ९२ कोटी १९ लाख रुपयांचा होता. तर २०२४ मध्ये १४७ कोटी ८१ लाख रुपयांचा सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यास आज सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

अष्टविनायक विकास आराखड्यातील एकूण

१४७ कोटी ८१ लाख रुपयांपैकी १०० कोटी ५३ लाख रुपये मंदिर जीर्णोद्धार, परिसर विकासावर तर विद्युतीकरण, रोषणाई, वास्तूविशारद, जीएसटी आदींवर ४७ कोटी ३९ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे अष्टविनायक (Ashtavinayak Temples) क्षेत्राच्या विकासाला गती मिळणार असून त्याबद्दल भाविकांकडून, नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

(हेही वाचा – BMC : पाणी साचण्याची नवीन ठिकाणे आढळली, त्याची कारणे शोधा; महापालिका आयुक्तांचे सहायक आयुक्तांसह उपायुक्तांना निर्देश)

मंदिर आणि निधी

मोरगाव श्री मयुरेश्वर – ८ कोटी २१ लाख,
थेऊर श्री चिंतामणी – ७ कोटी २१ लाख,
ओझरच्या श्री विघ्नेश्वर – ७ कोटी ८४ लाख
रांजणगाव श्री महागणपती – १२ कोटी १४ लाख
महड श्री वरदविनायक – २८ कोटी २४ लाख
पाली श्री बल्लाळेश्वर – २६ कोटी ९०लाख
अहिल्यानगर श्री सिद्धटेक – ९ कोटी ९७ लाख

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.