कर्जतमध्ये BJP ची मोठी राजकीय ‘घडामोड’; राष्ट्रवादी – काँग्रेसच्या 11 नगरसेवकांचा पक्षप्रवेश

97
कर्जतमध्ये BJP ची मोठी राजकीय ‘घडामोड’; राष्ट्रवादी - काँग्रेसच्या 11 नगरसेवकांचा पक्षप्रवेश
  • प्रतिनिधी

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत नगर पंचायतीतील राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेसचे तब्बल 11 नगरसेवक मंगळवारी भारतीय जनता पक्षात (BJP) दाखल झाले. या पक्षप्रवेशामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे.

भाजपा (BJP) प्रदेश कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, विजय चौधरी आदींच्या उपस्थितीत नगरसेवकांनी भाजप प्रवेश केला.

(हेही वाचा – नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; CM Devendra Fadnavis यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश)

या वेळी बावनकुळे यांनी सर्व नगरसेवकांचे पक्षात स्वागत करताना सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सक्षम नेतृत्व राज्यात विकासाचे चक्र फिरवत आहे. त्यामुळेच सर्वसामान्य कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी भाजपाकडे (BJP) आकर्षित होत आहेत.”

“आजच्या पक्षप्रवेशामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गट पूर्णपणे मोकळा झाला आहे,” असे खळबळजनक विधानही बावनकुळे यांनी यावेळी केले. राजकीय वर्तुळात या पक्षप्रवेशाला लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. स्थानिक पातळीवर भाजपाची (BJP) ताकद वाढली असून, मतदारसंघात नवा राजकीय समीकरण बदलण्याचे संकेत मिळत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.