नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; CM Devendra Fadnavis यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

74
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; CM Devendra Fadnavis यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
  • प्रतिनिधी 

राज्यात मान्सूनपूर्व आलेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचे आदेश दिले आहेत.

(हेही वाचा – Cabinet Decision : एकाच क्लिकवर वाचा राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय)

गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत मे महिन्यात असलेल्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. काही भागात फळबागा उद्ध्वस्त झाल्या, तर काही ठिकाणी भात, भाजीपाला आणि कडधान्य पिकांचेही नुकसान झाले आहे. यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांची मोठी फरपट सुरू झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा ऐरणीवर आला. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना “नुकसानीचे तातडीने पंचनामे करून, शेतकऱ्यांना त्वरीत आर्थिक मदत देण्यात यावी,” असे स्पष्ट आदेश दिले. (CM Devendra Fadnavis)

(हेही वाचा – Mithi River मधील गाळाची वाहतूक थांबली; काय आहे कारण?)

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. या आपत्तीच्या काळात कोणत्याही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही.” राज्य सरकारच्या तात्काळ प्रतिसादामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, या मदतीच्या वितरणात पारदर्शकता आणि जलदगती हवी, अशी मागणीही कृषी क्षेत्रातून होत आहे. (CM Devendra Fadnavis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.