
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या विविध खात्यांच्या माध्यमातून अभियांत्रिकी प्रकल्प हाती घेण्यात येत असले तरी उपप्रमुख अभियंता संवर्गातील तब्बल १३ ते १४ पदे रिक्त असल्याची माहिती समोर येत आहे. महापालिकेच्यावतीने सध्या ८०० किलोमीटर लांबीचे सिमेंट काँक्रिटची कामे रस्ते विभागाच्यावतीने हाती घेण्यात आली आहेत. परंतु या खात्यातील दोन उपप्रमुख अभियंता संवर्गातील पदांचा भार कार्यकारी अभियंत्यांवर सोपवला गेला असून एका उपप्रमुख अभियंता येत्या काही दिवसांमध्ये सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे रस्ते विभागाची जबाबदारी नामधारी उपप्रमुख अभियंत्यांवर असून या खात्याचा कारभार करताना प्रमुख अभियंता यांना तारेवरील कसरत करावी लागत आहे. (BMC)
(हेही वाचा – Cabinet Decision : एकाच क्लिकवर वाचा राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय)
मुंबई महापालिकेत कार्यकारी अभियंता पदावरील व्यक्तीला उपप्रमुख पदावर पदोन्नती दिली जाते. परंतु अनेक कार्यकारी अभियंता पदावरील अभियंत्यांचे प्रस्तावांना मंजुरी न मिळाल्याने अनेक उपप्रमुख अभियंता पदे रिक्त आहेत. त्यामुळे या पदांचा भार प्रभारी कार्यकारी अभियंता यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. परंतु, महापालिकेत एप्रिल महिन्यात कार्यकारी अभियंता पदावरील अभियंत्यांच्या पदोन्नतीचे प्रस्ताव मंजूर करूनही त्यांना उपप्रमुख अभियंता पदी पदोन्नतीचा लाभ देण्यात येत नाही. महापालिका आयुक्तांनी एप्रिल महिन्यात कार्यकारी अभियंता पदावरील अभियंत्यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यांनतरही आजतागायत त्यांची नियुक्ती उपप्रमुख अभियंता पदावर करण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन प्रस्ताव मंजुर करूनही कार्यकारी अभियंत्याला उपप्रमुख अभियंत्याला पदोन्नतीचा लाभ देत नसून दुसरीकडे ही पदे रिक्त ठेवत असल्याचे पहायला मिळत आहे. त्या महापालिका प्रशासन उपप्रमुख अभियंता संवर्गाची पदे किती दिवस आणि कुणाची वर्णी लावण्यासाठी रिक्त ठेवत आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. (BMC)
(हेही वाचा – Mithi River मधील गाळाची वाहतूक थांबली; काय आहे कारण?)
रस्ते विभागातील पूर्व उपनगराचे उपप्रमुख अभियंता संजय सोनावणे हे महिन्यात सेवा निवृत्त होत आहेत तर पश्चिम उपनगर आणि शहराचे उपप्रमुख अभियंता हे कायम नसून या रिक्त पदांचा भार प्रभारी कार्यकारी अभियंत्यांकडे सोपवला गेला आहे. रस्ते विभागाप्रमाणेच अन्य अभियांत्रिकी विभागांतील उपप्रमुख अभियंता संवर्गातील पदे रिक्त ठेवल्याने ही सर्व रिक्त पदे कधी भरणार असा सवाल अभियंत्यांकडून केला जात आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community