IPL 2025, MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीवर चर्चा, ऑन-एअर झाला मोठा वाद

चेन्नई सुपर किंग्जचा संघ यंदा तळाला राहिला.

59
IPL 2025, MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीवर चर्चा, ऑन-एअर झाला मोठा वाद
IPL 2025, MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीवर चर्चा, ऑन-एअर झाला मोठा वाद
  • ऋजुता लुकतुके

५ वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला (CSK) यंदा गुण तालिकेत शेवटून पहिलं स्थान मिळालं. रविवारी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्घचा सामना जिंकून चेन्नईने निदान हंगामाचा शेवट विजयाने केला. पण, त्यांचा १४ सामन्यांतील हा फक्त चौथा विजय होता. त्यामुळे संघासाठी हा हंगाम नामुष्कीचाच होता. नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) अर्ध्या हंगामातच जायबंदी झाला. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) नेतृत्व सांभाळलं. पण, वैयक्तिक कामगिरी आणि खेळाडूंना बळ देण्यातही तो यंदा कमी पडला. (IPL 2025)

शिवाय चेन्नईच्या प्रत्येक सामन्याआधी त्याच्या निवृत्तीचीच चर्चा जास्त रंगली. चेन्नईचा संघ हंमागातून बाद झाल्यानंतर त्याची निवृत्ती आणि संधातील त्याच्या स्थानावरून माजी क्रिकेटपटूंची चांगलीच जुंपली. चर्चा म्हणून सुरू झालेला हा कार्यक्रम वाद आणि खडाजंगीकडे कधी वळला ते कळलंच नाही. चर्चेत सहभागी झाले होते – सुरेश रैना, आकाश चोप्रा आणि आरपी सिंग. ‘धोनीला यंदा अननुभवी खेळाडूचा दर्जा मिळाला नसता, तर तो चेन्नईच्या संघात तरी असता का?’ असा प्रश्न आकाश चोप्राने विचारला. त्यावर सुरेश रैनाने (Suresh Raina) उत्तर दिलं की, ‘नक्कीच असता. तो संघाबरोबर १८ वर्षं आहे. आणि आताही सर्वाधिक षटकार त्याच्याच नावावर आहेत.’ तिथून नवीनच वादाला चर्चेत सुरूवात झाली. (IPL 2025)

(हेही वाचा – Sunil Gavaskar : सुनील गावसकरांनी नवीन कर्णधार शुभमन गिलला काय इशारा दिला?)

‘संघाची आघाडीची फळी चांगली कामगिरी करत नसताना, तो ६,७ किंवा ८ व्या क्रमांकावर का फलंदाजी करतोय? त्याने वरती खेळायला यायला नको का? तो वर खेळण्या इतका तंदुरुस्त आहे का?’ असा थेट प्रश्नच चोप्राने पुढे विचारला. धोनीची तंदुरुस्ती आणि निवृत्तीवर आता सारखं बोललं जाऊ लागलं आहे. संजय बांगर (Sanjay Bangar) आणि ॲडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) यांनीही उघडपणे धोनीने खेळापासून आता दूर व्हावं असं मत मांडलं आहे.

तर खुद्द धोनीने सध्या ३-४ महिने आराम करून मग पुढे खेळायचं की नाही याचा निर्णय घेऊ असं म्हटलं आहे. रैनाने धोनीची पाठराखण करताना, तो ४४ व्या वर्षीही ५० च्या सरासरीने धावा करत असल्याचं सांगितलं. तसंच शिवम दुबे (Shivam Dube) सारख्या टी-२० तज्ज खेळाडूला संधी देण्यासाठी तो तळाला फलंदाजी करत असल्याचंही सांगितलं. धोनीचे दोन्ही गुडघे सध्या दुखावले आहेत. त्यामुळे त्याला विश्रांती लागते. शिवाय फलंदाजीबरोबरच २० षटकं यष्टीरक्षण करत असल्यामुळेही त्याच्यावर ताण पडतो आहे. त्याने चालू हंगामात जेमतेम २४ धावांच्या सरासरीने १९६ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट मात्र १३५ धावांचा आहे. (IPL 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.