IPL 2025, MI vs PBKS : मुंबईला ७ गडी राखून हरवत पंजाब आघाडीवर, मुंबई राहणार चौथ्या स्थानावर

जयपूरच्या लहान मैदानावर १८५ धावांचं आव्हान तोकडं पडलं.

47
IPL 2025, MI vs PBKS : मुंबईला ७ गडी राखून हरवत पंजाब आघाडीवर, मुंबई राहणार चौथ्या स्थानावर
IPL 2025, MI vs PBKS : मुंबईला ७ गडी राखून हरवत पंजाब आघाडीवर, मुंबई राहणार चौथ्या स्थानावर
  • ऋजुता लुकतुके

मुंबई इंडियन्सचा उधळलेला वारू रोखण्यासाठी गरज होती ती आत्मविश्वासाची. आणि रणनीती आखून त्या बरहुकूम कामगिरी करण्याची. तेच पंजाब किंग्जने (Punjab Kings) सोमवारी करून दाखवलं. मुंबईच्या फलंदाजीत धमक आहे. आणि दिल्लीविरुद्ध अगदी ५ गडी १२३ धावांत गारद झाले असताना त्यांनी शेवटच्या ४ षटकांत ५७ धावा वसूल केल्या होत्या. पंजाबविरुद्घही त्यांनी थोडाफार तोच प्रयत्न केला. पण, पंजाबच्या ४ बाद १०६ वरून हार्दिक (२६), नमन धीर(Naman Dhir) (२२) आणि सूर्यकुमार यादव(Suryakumar Yadav) (५१) यांनी १८० धावांचा टप्पा मुंबईला जरुर गाठून दिला. पण, पंजाबच्या गोलंदाजांचा टप्पा अचूक होता. त्यामुळे जवळ जवळ प्रत्येक षटकारानंतर त्याच षटकात त्या फलंदाजाचा बळी गेला. अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) ४ षटकांत २८ धावा देत २ बळी मिळवले. आणि महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या षटकांत फक्त ३ धावा दिल्या.

नाहीतर आधीच्या दोन षटकांत ४० धावा वसूल करून मुंबईने पुन्हा एकदा मोठ्या धावसंख्येकडे कूच केलेलं होतं. पण, अर्शदीपने फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमारलाही रोखलं. मार्को यानसेन आणि विजयकुमार व्यक्ष यांनीही चांगली गोलंदाजी करताना प्रत्येकी दोन बळी घेतले. या सगळ्यांनी मिळून यजुवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) उणीव संघाला भासू दिली नाही. दुसरीकडे, मुंबईचे फलंदाज चांगल्या सुरुवातीनंतर विशीतच बाद झाले. त्यांच्यात भागिदारी अशी रंगली नाही. त्यामुळे निर्धारित २० षटकांत मुंबईचा संघ ७ बाद १८४ धावा करू शकला. जयपूरच्या लहान मैदानावर ही धावसंख्या पुरेशी नव्हतीच. आणि पंजाबच्या फलंदाजांनी पुढे तेच दाखवून दिलं. (IPL 2025, MI vs PBKS)

Insert tweet – https://x.com/IPL/status/1927062687021699258

प्रभसिमरन सिंग(Prabhsimran Singh) १३ धावांवर बाद झाल्यानंतर प्रियांश आर्य(Priyansh Arya) आणि जोश इंग्लिस(Josh Inglis) यांनी १०७ धावांची दमदार भागिदारी केली. तिथून सामना त्यांनी पंजाबच्या बाजूने झुकवला. दोघांनी दोन्ही बाजूंनी हल्ला चढवला. बोल्ट, बुमराह या जमून आलेल्या जोडीला ते घाबरले नाहीत. दोघांनी जवळ जवळ १७५ च्या स्ट्राईकरेटने धावा फटकावल्या. त्यामुळे १८४ धावांचा पाठलाग करतानाही संघ कधीच अडचणीत सापडला नाही. त्यातच मुंबईच्या क्षेत्ररक्षकांनी झेलही सोडले. इंग्लिसने ४४ चेंडूंत ७३ धावा केल्या. तर प्रियांश आर्य ३५ चेंडूंत ६२ धावा करून बाद झाला. (IPL 2025, MI vs PBKS)

हे दोघं बाद झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) १६ चेंडूंत नाबाद २६ धावा करत एक षटक राखूनच पंजाबला विजयी केलं. या विजयासह १४ सामन्यांतून ९ विजय मिळवत पंजाबचा संघ १९ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. आणि अव्वल दोघांतील आपलं स्थान त्यांनी पक्कं केलं आहे. तर मुंबईचा संघ १६ गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला आहे. आता शेवटचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि लखनौ सुपरजायंट्स (LSG) यांच्यादरम्यान मंगळवारी होणार आहे. आणि हा सामना जिंकून पंजाबसह अव्वल दोन संघांमध्ये पोहोचण्याची संधी बंगळुरूला असेल. (IPL 2025, MI vs PBKS)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.