Ram Setu ला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी

404
“राम सेतू (Ram Setu) ला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची विनंती करत, भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
याचिकेद्वारे स्वामींनी राम-सेतूला (Ram Setu) राष्ट्रीय स्मारक आणि राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्याच्या त्यांच्या याचिकेवर केंद्राला निर्णय घेण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे. स्वामींनी केंद्राकडे मागणी केली होती. त्यांच्या याचिकेत, सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे की, जानेवारी २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, त्यांनी केंद्राला राम सेतूला (Ram Setu) राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची विनंती केली होती, परंतु केंद्र सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
याचिकेत, सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे की, राम सेतू प्राचीन स्मारक म्हणवून घेण्यासाठी सर्व निर्धारित निकष पूर्ण करतो. या मानवनिर्मित रचनेत ऐतिहासिक, पुरातत्वीय आणि कलात्मक आधार अजूनही आहेत. राम सेतू (Ram Setu) प्राचीन स्मारकाच्या सर्व अटी पूर्ण करतो. या जनहित याचिकेत असे म्हटले आहे की, प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळ कायद्याच्या कलम ३/४ अंतर्गत राम सेतू एक प्राचीन स्मारक आहे. प्राचीन स्मारकांना राष्ट्रीय महत्त्वाच्या रचना आणि राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित करण्याच्या नियमानुसार केंद्र सरकार ते राष्ट्रीय वारसा घोषित करण्यास बांधील आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.