सुखाने भाकरी खा, नाहीतर माझी गोळी आहेच; PM Narendra Modi पुन्हा पाकिस्तानवर कडाडले

PM Narendra Modi :   'सुखाने भाकरी खा, नाहीतर माझी गोळी आहेच. पाकिस्तानसारख्या देशाला दहशतवाद पर्यटनासारखे वाटणे, हा जगासाठी एक मोठा धोका आहे', असा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी दिला. भुज येथील विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान बोलत होते.

88

PM Narendra Modi :   ‘सुखाने भाकरी खा, नाहीतर माझी गोळी आहेच. पाकिस्तानसारख्या देशाला दहशतवाद पर्यटनासारखे वाटणे, हा जगासाठी एक मोठा धोका आहे’, असा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी दिला. भुज येथील विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान बोलत होते. पंतप्रधान मोदी दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर असून भूजमध्ये ५३,४०० कोटी रुपयांच्या ३१ प्रकल्पांची पायाभरणी आणि ई-उद्घाटन देखील केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, भारत पर्यटनावर विश्वास ठेवतो, पर्यटन लोकांना एकत्र आणते. पण पाकिस्तानसारख्या देशाला दहशतवाद हा पर्यटन वाटतो. हा जगासाठी एक मोठा धोका असल्याचे ते म्हणाले.(PM Narendra Modi)

ते म्हणाले, दहशतवादाविरुद्ध सरकारचे धोरण शून्य सहनशीलतेचे असून ऑपरेशन सिंदूरने हे धोरण स्पष्ट केले आहे. जो कोणी आमचे रक्तपात करेल त्याला असेच उत्तर मिळेल, असा सज्जड इशारा पंतप्रधानांनी पाकिस्तानला दिला. तसेच, भारतावर हल्ला करणाऱ्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही असे सांगतानाच ऑपरेशन सिंदूर हे मानवतेला वाचविण्याचे आणि दहशतवाद संपविण्याचे एक अभियान आहे, असे पंतप्रधान मोदीं(PM Narendra Modi)नी सांगितले.

(हेही वाचा ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं; अन्यथा जनता विचारेल “पावसात तुम्ही कुठे होता?” Ashish Shelar यांचा घणाघात )

दरम्यान, पाकिस्तान दहशतवादाविरुद्ध काही पावले उचलेल का हे पाहण्यासाठी आम्ही १५ दिवस वाट पाहिली. परंतु, दहशतवाद पाकिस्तानकरिता खाद्यान्नांचा भाग. त्यामुळे त्यांनी दहशतवादाविरोधात काहीही केले नसल्याने सरकारने भारतीय सशस्त्र दलांना मोकळीक दिल्याचे पंतप्रधान मोदी(PM Narendra Modi) म्हणाले. ते पुढे म्हणाले, भारतावर डोळा टाकणाऱ्या कोणालाही कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही. पाकिस्तानला शांततेत राहण्याचा सल्ला देतो अन्यथा भारतीय सैन्यदलांच्या गोळ्या आहेत, असा स्पष्ट इशाराच त्यांनी यावेळी दिला.

पंतप्रधान मोदींनी दाहोद आणि भुज येथे जाहीर सभांना संबोधित करताना म्हटले की, भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आज पाकिस्तानची काय अवस्था आहे? आज पाकिस्तानच्या मुलांना आणि लोकांना विचार करावा लागेल की तुमचे सैन्य, तुमचे राज्यकर्ते दहशतीच्या सावलीत वाढत आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले. तुमचे सरकार दहशतवादाला पाठिंबा देत असून हे त्यांच्या सैन्यासाठी पैसे कमविण्याचे एक साधन बनले आहे. ते तुमचे भविष्य उद्ध्वस्त करत असून तुम्हाला अंधारात ढकलत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या लोकांना पुढे यावे लागेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.(PM Narendra Modi)

भारत दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करू शकतो हे दाखवून दिले

पंतप्रधान म्हणाले की, सरकारने सैन्यदलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले असून दहशतवाद्यांचे मुख्यालय हे लष्कराचे लक्ष्य होते. भारतीय सैन्यही आजूबाजूच्या परिसराचे कोणतेही नुकसान न करता परतले. भारतीय सैन्याने कारवाई करून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करता येतात हे आम्ही दाखवून दिले. आपल्या सैन्याच्या ताकदीमुळेच आजही पाकिस्तानचे सर्व वायुमार्ग आयसीयूमध्ये आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.(PM Narendra Modi)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.