
-
प्रतिनिधी
मुंबईत सोमवारी पडलेल्या जोरदार पावसाने शहराचं जनजीवन विस्कळीत केलं असताना, या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी थेट शिवसेना उबाठा नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता परंतु जोरदार शब्दांत हल्लाबोल केला. “मुंबई पाण्यात बुडत असताना, आदित्य ठाकरे लंडनच्या थेम्स आणि पॅरिसच्या सीन नदीची पाहणी करत होते का?” असा सपशेल सवाल शेलारांनी केला.
“२६ जुलैच्या पुरात उद्धव ठाकरे कुठे होते?”
शेलारांनी फक्त आदित्य ठाकरे नव्हे तर शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य करत विचारले, “२००५ साली मुंबईवर महाप्रलय कोसळला, तेव्हा महानगरपालिकेचे नेतृत्व करणारे उद्धवजी रस्त्यावर उतरले होते का? की फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून पाहणी करत होते?”
त्यांनी आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदांनाही “चोर मचाये शोर” असे ठणकावून हिणवत म्हटले की, “मुंबईची दुर्दशा शिवसेना उबाठा कट – हिश्शा कारभाराचा परिणाम आहे. २५ वर्षे कंत्राटदारांशी कट-कोमिशनचा खेळ खेळला गेला, त्यामुळे आज मुंबईला पावसात तुंबण्याची वेळ आली आहे.”
(हेही वाचा – Fisheries व बंदर विभागाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना आशियाई बँकेकडून आर्थिक बळ मिळण्याचा मार्ग मोकळा!)
“कमिशनर देखील ‘विदेशवारी’त मग्न!”
शेलारांनी (Ashish Shelar) मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही नाव न घेता लक्ष्य केले. “आयुक्त खालच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकून परदेशात फिरत असतील, तर मुंबईला पाणी तुंबणारच. ते सुद्धा थेम्स आणि सीन नदीवर गेले होते का?” असा उपरोधिक सवाल त्यांनी केला.
“मेट्रो ३ मध्ये पाणी? आदित्य यांना ‘पोटदुखी’ झालीय!”
मेट्रो ३ च्या स्थानकामध्ये पाणी शिरल्याबाबत विचारल्यावर शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “मुंबईकरांसाठी मेट्रोसेवा सुरु झाली म्हणून आदित्य ठाकरेंना पोटदुखी झाली आहे काय? त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात उपरोध आणि वैताग दिसतो, नागरिकांच्या समस्यांबाबत चिंता दिसत नाही.”
(हेही वाचा – Mumbai Rain : दादर धारावी नाल्याकडे दुर्लक्ष; लोकांच्या घरांमध्ये पहिल्याच पावसात शिरले पाणी)
“२५ मिमी पावसाचा आकडा उद्धव ठाकरेंनी स्वप्नात ठरवलाय?”
ताशी २५ मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला नव्हता, हे काही उद्धव ठाकरे यांनी मनाने ठरवलंय का? असा टोला लगावत शेलार (Ashish Shelar) म्हणाले की, “वरुणदेव (इथे दुसरे ‘वरुण’ नव्हे!) आदित्यजींना पावसाची आकडेवारी सांगत असतील का?”
“ठाकरे गप्प राहा, आम्ही उत्तरदायित्व घेतलंय”
भाजपा – शिंदे सरकार मुंबईच्या समस्यांचा खंबीरपणे सामना करतंय, हे सांगत शेलार म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जपानी तंत्रज्ञानाच्या आधारे तुंबई टाळण्यासाठी जपानमध्ये करार करून आले आहेत आणि त्यावर काम सुरू आहे. जनता आता शिवसेनेच्या कोल्हेकुईला बळी पडणार नाही.”
शेवटी शेलारांचा (Ashish Shelar) रोख स्पष्ट होता – ‘मुंबईकरांच्या जखमांवर फक्त टीका करण्याऐवजी, ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं; अन्यथा जनता विचारेल – “पावसात तुम्ही कुठे होता? लंडनमध्ये का पॅरिसमध्ये?”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community