Water Cut : दक्षिण मुंबईतील ‘या’ भागांमध्ये येत्या बुधवारी आणि गुरुवारी नसेल पाणी; आतापासूनच करा पाण्याची बचत

212
Water Cut : दक्षिण मुंबईतील 'या' भागांमध्ये येत्या बुधवारी आणि गुरुवारी नसेल पाणी; आतापासूनच करा पाण्याची बचत
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

मुंबई महानगरपालिकेतर्फे ‘ई’ विभागातील पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्याकरिता नवीन कामे हाती घेण्यात आली आहेत. या अंतर्गत नवानगर, डॉकयार्ड मार्ग येथील जुनी १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बंद करुन, नवीन १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच भंडारवाडा जलाशयाचा कप्पा – १ वरील ९०० मिलीमीटर व्यासाचे जुने जलद्वार काढून नवीन ९०० मिलीमीटर व्यासाचे जलद्वार बसविण्यात येणार आहे. ही दोन्ही कामे बुधवारी २८ मे २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून हाती घेण्यात येणार आहे. हे काम गुरुवारी २९ मे २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कालावधीमध्ये दक्षिण मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा पूर्णतः बंद तर काही भागात अंशत: बंद राहणार आहे. (Water Cut)

या परिसरातील नागरिकांनी, या जलवाहिनी बदलण्याच्या कामाच्या आधी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा. तसेच, पाणीपुरवठा बंद असलेल्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने वापर करावा. तसेच या जलवाहिनीच्या कामानंतर संबंधित परिसरांमध्ये पुढील दोन दिवस कमी दाबाने व गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, तसेच महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (Water Cut)

(हेही वाचा – DCM Eknath Shinde यांचा आपत्ती व्यवस्थापनावर भर; म्हणाले, राजकारण करणाऱ्यांना…)

या भागांत होणार आहे पाणीकपात : 

ए विभाग : नेव्हल डॉकयार्ड पाणीपुरवठा परिक्षेत्र – सेंट जॉर्ज रुग्णालय, पी. डि’मेलो मार्ग, रामगड झोपडपट्टी रिझर्व्ह बँक (आर. बी. आय.), नेव्हल डॉकयार्ड, हुतात्मा भगतसिंग मार्ग, मुख्य टपाल कार्यालय (जी. पी. ओ.) जंक्शन पासून रिगल चित्रपटगृहापर्यंत

बी विभाग : बाबूला टँक परिक्षेत्र – मोहम्मद अली मार्ग, इब्राहिम रहिमत्तुला मार्ग, इमामवाडा मार्ग, इब्राहिम मर्चंट मार्ग, युसूफ मेहेर अली मार्ग, पीरु गल्ली, नारायण धुरु, अब्दुर रहेमान मार्ग, नाकोडा, कोलसा

डोंगरी ‘ब’ परिक्षेत्र – तांडेल, टनटनपूर, मोहम्मद उमर कोकील मार्ग, वाय. एम. मार्ग, खडक, इजराईल मोहल्ला, व्ही. व्ही. चंदन, दर्यास्थान, धोबी शेरीफ देवजी, रघुनाथ महाराज, ओल्ड बंगालीपुरा भंडारी, आचार्य चंद गांधी मार्ग, निशाणपाडा, मशीद बंदर, लोकमान्य टिळक टर्मिनस (एल. टी. टी.) मार्ग, नूरबाग, डोंगरी, रामचंद्र भट मार्ग, सॅम्युअल स्ट्रीट, केशवजी नाईक मार्ग, नरसी नाथा स्ट्रीट

डोंगरी ‘अ’ परिक्षेत्र – उमरखाडी, नूरबाग चिंचबंदर, कारागृह मार्ग, वालपाखाडी, आनंदराव सुर्वे मार्ग, माहेश्वरी मार्ग, केशवजी नाईक, निशाणपाडा पथ, पॅल्क मार्ग, नौरोजी हिल तांडेल, समंथाभाई नानजी मार्ग, रामचंद्र भट मार्ग, समताभाई नानजी मार्ग, शायदा मार्ग, नूरबाग आणि डॉ. महेश्वरी मार्ग (Water Cut)

मुंबई पोर्ट ट्रस्ट (बी. पी. टी.) परिक्षेत्र- संपूर्ण मुंबई पोर्ट ट्रस्ट (बी. पी. टी.) परिक्षेत्र, पी. डि’मेलो मार्ग

मध्य रेल्वे – रेल्वे यार्ड

‘ई’ विभाग : ना. म. जोशी मार्ग, मदनपुरा, बदलूपुरा, नागपाडा, शेख हाफिजुद्दीन मार्ग, गणेश हरी पारुंडेकर मार्ग, पाईस स्ट्रीट, मुसा किल्लेदार स्ट्रीट, एम. एस. अली मार्ग, एम. ए. मार्ग, टँक पाखाडी मार्ग, क्लेअर मार्ग, सोफिया जुबेर मार्ग, भायखळा (पश्चिम), बी. जे. मार्ग, के. के. मार्ग

मुंबई सेंट्रल पाणीपुरवठा : एम. एस. अली मार्ग, बेलासिस मार्ग, कामाठीपुरा, एस. पी. मार्ग, शुक्लाजी स्ट्रीट, मनाजी राजूजी मार्ग, आग्रीपाडा

३. बाबूला टँक पाणीपुरवठा डिमटिमकर मार्ग, उंद्रिया स्ट्रीट, खांडिया स्ट्रीट, टेमकर स्ट्रीट, शेख कमरुद्दीन स्ट्रीट, मस्तान टँक मार्ग, टँक स्ट्रीट, काझिपुरा, डंकन मार्ग, जे. जे. मार्ग (दिनांक २९ मे २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

एफ दक्षिण पाणीपुरवठा : दत्ताराम लाड मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भाई बाल मुकुंद मार्ग, काळाचौकी, चिंचपोकळी, टी. बी. कदम मार्ग

म्हातारपाखाडी मार्ग परिक्षेत्र : म्हातारपाखाडी मार्ग, सेंट मेरी मार्ग, नेसबीट मार्ग, ताडवाडी रेल्वे कुंपण, शिवदास चापसी मार्ग

डॉकयार्ड मार्ग परिक्षेत्र : माझगाव कोळीवाडा, नरसू नाखवा मार्ग, ब्रम्हदेव खोट मार्ग, दर्गा गल्ली, हॉस्पिटल गल्ली, चर्च गल्ली, बेकर गल्ली, नवाब टँक पूल, बॅरिस्टर नाथ पै मार्ग, डिलिमा स्ट्रीट, गणपि रस्ता, कासार गल्ली, लोहारखाता, कोपरस्मीथ मार्ग (Water Cut)

हातीबाग मार्ग : हातीबाग, शेठ मोतिशहा गल्ली, डी. एन. सिंग मार्ग

जे. जे. रुग्णालय – जे. जे. रुग्णालय

मुंबई पोर्ट ट्रस्ट (बी. पी. टी.) मार्ग परिक्षेत्र: मुंबई पोर्ट ट्रस्ट (बी.पी.टी.), दारुखाना

रे रोड मार्ग परिक्षेत्र – बॅ. नाथ पै मार्ग, मोदी कुंपण, ऍटलास मील कुंपण, घोडपदेव छेद गल्ली

माऊंट मार्ग परिक्षेत्र : रामभाऊ भोगले मार्ग, फेरबंदर नाका, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणी बाग), घोडपदेव नाका, म्हाडा संकुल, भायखळा (पूर्व), शेठ मोतिशहा गल्ली, टी. बी. कदम मार्ग, संत सावता मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. म्हस्कारहन्स मार्ग, डी. पी. वाडी, काळाचौकी, नारियलवाडी, संत सावता मार्ग, चापसी भीमजी मार्ग (Water Cut)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.