Nariman Point to palghar : मुंबईत होतेय आणखी एक सी-लिंक ! मरीन ड्राईव्ह ते पालघर प्रवास फक्त सव्वा तासात

Nariman Point to palghar : मुंबईत होतेय आणखी एक सी-लिंक ! मरीन ड्राईव्ह ते पालघर प्रवास फक्त सव्वा तासात

151
Nariman Point to palghar : मुंबईत होतेय आणखी एक सी-लिंक ! मरीन ड्राईव्ह ते पालघर प्रवास फक्त सव्वा तासात
Nariman Point to palghar : मुंबईत होतेय आणखी एक सी-लिंक ! मरीन ड्राईव्ह ते पालघर प्रवास फक्त सव्वा तासात

मरीन ड्राइव्ह ते पालघर (Nariman Point to palghar) दरम्यान उभारण्यात येणाऱ्या सागरी सेतू प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली आहे. या प्रकल्पामुळं मरीन ड्राइव्हवरुन पालघरला विनाथांबा एक ते सव्वा तासांत पोहोचता येणार आहे. सागरी सेतूंच्या या श्रृखंलेतील उत्तन-विरार सागरी सेतूच्या प्रस्तावाला लवकरच हिरवा कंदील मिळण्याची चिन्हे आहेत. पुढे विरार ते पालघर असाही सागरी सेतू उभारण्याचे प्रस्तावित आहे. विरार-पालघर सागरी सेतूची सुसाध्यता तपासणीही सध्या एमएमआरडीएकडून सुरू आहे. त्यातून दक्षिण मुंबईवरून गुजरातकडे जाणारी वाहतूक जलद होणार आहे. (Nariman Point to palghar)

हेही वाचा-कोथरूडसह पुण्यात कुठेही पाणी साचू नये याची दक्षता घ्या; Chandrakant Patil यांची सूचना

मरीन ड्राईव्ह ते वरळी कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला झाला आहे, तर वांद्रे वरळी सी लिंक वापरात आहे. सद्य:स्थितीत एमएसआरडीसीकडून वांद्रे वर्सोवा सागरी सेतूचे काम सुरू आहे. त्यापुढे वर्सोवा ते भाईदर कोस्टल रोड उभारण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. येत्या काही महिन्यांत प्रत्यक्ष जमिनीवरील कामाला सुरुवात होणार आहे. उत्तन ते विरार हा सागरी प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतला असून, त्याला प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. (Nariman Point to palghar)

हेही वाचा- Fishing Ban : ‘या’ तारखेपर्यंत क्षेत्रीय जलधी क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक नौकांना मासेमारी बंदी

उत्तन ते विरार सागरी सेतूमुळे दक्षिण मुंबईतून थेट विरारपर्यंत विनाअडथळा पोहोचणे शक्य होईल. त्यातून नरिमन पॉइंट येथून विरार येथे पोहण्यासाठी केवळ एक तासाचा वेळ लागेल. पश्चिम द्रुतगती महामार्ग, एस. व्ही. रोड आणि लिंक रोडसारख्या प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होऊन कोंडी दूर होईल. यामुळे प्रवासाचा कालावधी कमी होईल. रस्ते अपघात कमी होतील आणि ध्वनी व वायूप्रदूषणात लक्षणीय घट होणार आहे. (Nariman Point to palghar)

उत्तन विरार सागरी प्रकल्पाची माहिती (Nariman Point to palghar)
प्रकल्पाची एकूण लांबी – 55.12 किमी
सागरी सेतू – 24.35 किमी
विरार कनेक्टर – 18.95 किमी
उत्तन कनेक्टर -9.32 किमी
वसई कनेक्टर – 2.5 किमी
प्रकल्पाची किंमत – 87,432 कोटी

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.