Pune Rain : पुणे जिल्ह्यात तुफान पाऊस ! कालवा फुटला, नद्यांना पूर आला, घराघरांत पाणी शिरलं ; Ajit Pawar यांनी केली पाहणी

Pune Rain : पुणे जिल्ह्यात तुफान पाऊस ! कालवा फुटला, नद्यांना पूर आला, घराघरांत पाणी शिरलं ; Ajit Pawar यांनी केली पाहणी

152
Pune Rain : पुणे जिल्ह्यात तुफान पाऊस ! कालवा फुटला, नद्यांना पूर आला, घराघरांत पाणी शिरलं ; Ajit Pawar यांनी केली पाहणी
Pune Rain : पुणे जिल्ह्यात तुफान पाऊस ! कालवा फुटला, नद्यांना पूर आला, घराघरांत पाणी शिरलं ; Ajit Pawar यांनी केली पाहणी

पुणे शहरात पुन्हा तुफान पावसाला (Pune Rain) सुरूवात झाली आहे. पुणे-सोलापूर महामार्गाला ओढ्याचं स्वरूप आलं आहे. भिगवणमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे. इंदापूर तालुक्यात पावसामुळे झाडे कोसळली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. भिगवणमध्ये मुसळधार पावसामुळे घरांत पाणी शिरलंय. तसेच रस्त्यांवर पूरसदृश स्थिती पाहायला मिळत आहे. भिगवणमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाने थैमान घातलंय. (Pune Rain)

रस्त्यावरून पाण्याचे लोंढे
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्विस रोडवर पाणी साचलंय. जवळपास 3 किलोमीटरपर्यंतचा हा सर्विस रोड पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. संपूर्ण भिगवण बसस्टँड परिसरात पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. भिगवणच्या थोरात नगर भागात रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहताना दिसत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Pune Rain)

दोन धोकादायक इमारतींमधील कुटुंबीयांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बारामतीमध्ये तुफान पावसानं हजेरी लावली आहे. अशातच नीरा डावा कालवा फुटल्यानं पाणी पालखी महामार्गावर आलं असून काटेवाडी-भवानीनगर हा रस्ता बंद करण्यात आला आहे. या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी पाहणी केली. पिंपळीत हा कालवा फुटला असून आजूबाजूच्या परिसरात असलेल्या शेतीला याचा मोठा फटका बसला आहे. या कालव्याची देखील अजित पवारांनी पाहणी केली. या ठिकाणी अनेक घरांमध्ये पाणी साचलंय. तिकडे पेन्सिल चौकाजवळील दोन धोकादायक इमारतींमधील कुटुंबीयांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे. (Pune Rain)

पुणे पाऊस(मिमी) 09:30 PM 25.05.2025 (Pune Rain)

दौंड 98.0
लोणावळा 76.0
बारामती 49.5
धामधरे 35.5
वडगावशेरी 34.0
निमगिरी 28.0
मालिन 27.0
हडपसर 25.0
बल्लाळवाडी 18.5
नारायणगाव 17.0
डुडुळगाव 12.5
मगरपट्टा 8.0
GIRIVAN 7.0
लवासा 6.0
राजगुरुनगर 5.5
कोरेगाव पार्क 5
भोर 5
NDA 3.5
तळेगाव 2.5
पुरंदर 0.5

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.