Namo Drone Didis :  ‘सकाळी तीन तास अन् संध्याकाळी दोन तासांत काम पूर्ण’; ग्रामीण भागात आता ड्रोन वॉरियर्स…

मन की बातच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'नमो ड्रोन दीदी'(NAMO Drone Didis) योजनेचा उल्लेख केला. भारत सरकारच्या केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत कृषी क्षेत्रात नवी क्रांती घडून आली आहे.महिला ड्रोन ऑपेटरर्सना पंतप्रधान मोदींनी 'आकाश योध्दा' असे संबोधले आहे.(NAMO Drone Didis)

110

मन की बातच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘नमो ड्रोन दीदी'(Namo Drone Didis) योजनेचा उल्लेख केला. भारत सरकारच्या केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत कृषी क्षेत्रात नवी क्रांती घडून आली आहे.महिला ड्रोन ऑपेटरर्सना पंतप्रधान मोदींनी ‘आकाश योध्दा’ असे संबोधले आहे.(Namo Drone Didis) देशात अनेक महिला अशा आहेत ज्या शेतात काम करत आहेत, त्या अवकाशाच्या नवनव्या उंची गाठत आहेत. तसेच, केंद्र सरकारच्या योजनेतून ग्रामीण भागातील महिला ड्रोन दीदी(Namo Drone Didis) म्हणून ड्रोन उडवित आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

(हेही वाचा Pakistan Blast :  एकामागून एक ३ वाहने उडवली…; कराची-क्वेट्टा महामार्गावर पुन्हा एकदा हल्ला, ३२ सैनिक ठार )

दरम्यान, मन की बातच्या १२२व्या भागात देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, कधीकाळी ज्या महिलांना इतरांवर अवलंबून राहावे लागत होते त्या तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यात ड्रोन योजनेचा मोठा फायदा झाला. येथील महिला शेतकरी ड्रोनच्या मदतीने ५० एकर जमिनीवर कीटकनाशके फवारण्याचे काम पूर्ण करत आहेत, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. या योजनेमुळे(Namo Drone Didis) ग्रामीण भागातील महिला सकाळी तीन तास, संध्याकाळी दोन तासात काम पूर्ण करतानाच कडक उन्हाचाही त्रास नाही आणि विषारी रसायनांचा धोकाही उद्भवत नसल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

(हेही वाचा PM Modi Mann Ki Baat : ऑपरेशन सिंदूरचे कौतुक, दहशतवाद संपवण्याचा केला निर्धार )

ते पुढे म्हणाले, ‘नमो ड्रोन दीदी'(Namo Drone Didis) योजनेच्या माध्यमातून महिलांच्या नेतृत्वाखालील बचत गटांना कृषी सेवा देण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाने सुसज्ज करून सक्षम करणे आहे. तसेच, आता या महिला ‘ड्रोन ऑपरेटर’ म्हणून ओळखल्या जात नाहीत तर ‘आकाश योद्धा’ म्हणून ओळखल्या जात आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले.या योजनेद्वारे, केंद्र सरकार ग्रामीण भागातील महिलांना सक्षम बनवताना कृषी पद्धतींना पुढे नेण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. हा उपक्रम महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला प्रोत्साहन देणे आणि शेतीसारख्या पारंपारिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या सरकारच्या व्यापक उद्दिष्टांशी सुसंगत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.(Namo Drone Didis)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.