Mulund : राज्यात गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आता मुंबईमधील मुलुंड येथील भाजपाचे आमदार मिहिर कोटेचा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दरम्यान धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटकदेखील केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुलुंड मतदार संघाचे आमदार मिहीर कोटेचा (MLA Mihir Kotecha) यांच्या ड्रायव्हरला ही धमकी देण्यात आली होती. (Mulund) (हेही वाचा – Pakistan Blast : एकामागून एक ३ वाहने उडवली…; कराची-क्वेट्टा महामार्गावर पुन्हा एकदा हल्ला, ३२ सैनिक ठार)
ड्रायव्हरने सांगितल्याप्रमाणे धमकी देणारा आला आणि म्हणाला की, “तू आमदाराचा ड्रायव्हर आहेस ना? तुझ्या आमदाराला सांग, हिशोबामध्ये राहिला नाही तर सोडणार नाही. माझं नाव सत्यवान गरुड आहे, तुझ्या आमदाराला माहित आहे”, असंही त्याने दमदाटी करून सांगितलं.
(हेही वाचा – Jyoti Malhotra च्या फोनमधून मोठा खुलासा; ती पाकिस्तानी युट्यूबरसोबत मिळून करत होती ‘हे’ काम) या घटनेमुळे घाबरलेला मुत्तू तेवर भांडुप पश्चिमेला घरी परतला. दुसऱ्या दिवशी दुपारी कामावर हजर झाल्यावर त्याने कोटेंचाच्या कार्यालयातील सहकाऱ्यांना कळवले. त्यांनी त्याला पोलीस तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मुत्तूने शनिवारी दुपारी मुलुंड पोलीस ठाण्यात (Mulund Police Station) संपर्क साधला आणि एफआयआर दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी सत्यवान गरुडला अटक केली. हेही पहा –