PM Modi Mann Ki Baat : ऑपरेशन सिंदूरचे कौतुक, दहशतवाद संपवण्याचा केला निर्धार

97
PM Modi Mann Ki Baat : रविवारी २५ मेला मन की बातच्या १२२ वा भाग प्रसारित करण्यात आला. यावेळी  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि ऑपरेशन सिंदूरबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले की आज संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एक झाला आहे . तसेच संपूर्ण दहशतवाद नष्ट करायचा आहे. असा निर्धार ही यावेळी बोलून दाखवला. ऑपरेशन सिंदूर हे केवळ लष्कराचे अभियान नाही, तर ते भारत बदलण्याचे एक शक्तिशाली चित्र आहे. (PM Modi Mann Ki Baat)

(हेही वाचा – Manipur : सुरक्षा दलांनी मणिपूरमधून तीन माओवाद्यांना अटक; वाहन जप्त)

मन की बात’ कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एकजूट झाला आहे, तो संतापाने भरलेला आहे आणि दृढनिश्चयी आहे. आज प्रत्येक भारतीयाचा संकल्प आहे की आपल्याला दहशतवाद संपवायचा आहे. मित्रांनो, ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान आपल्या सैन्याने दाखवलेल्या शौर्यामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला आहे. आपल्या सैन्याने सीमेपलीकडे दहशतवाद्यांचे अड्डे ज्या पद्धतीने, आणि अचूकतेने उद्ध्वस्त केले आहेत ते आश्चर्यकारक आहे. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’ ने जगभरातील दहशतवादाविरुद्धच्या लढाईत नवा आत्मविश्वास आणि उत्साह दिला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे केवळ एक लष्करी मोहीम नाही, तर ते आपल्या दृढनिश्चयाचे, धैर्याचे आणि बदलत्या भारताचे चित्र आहे.

यावेळी पंतप्रधान मोदींनी बिकानेर भेटीदरम्यान मुलांसोबत झालेल्या भेटीचाही उल्लेख केला. ते म्हणले की, “मी फक्त तीन दिवसांपूर्वी बिकानेरला गेलो होतो. तिथे मुलांनी मला असेच एक चित्र दाखवले. त्यात ‘ऑपरेशन सिंदूर’ ने देशातील लोकांवर इतका प्रभाव पाडला आहे की, अनेक कुटुंबांनी ते त्यांच्या जीवनाचा एक भाग बनवले आहे. बिहारमधील कटिहार, उत्तर प्रदेशातील कुशीनगर आणि इतर अनेक शहरांमध्ये, त्या काळात जन्मलेल्या मुलांचे नाव ‘सिंदूर’ ठेवण्यात आले आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

(हेही वाचा – Delhi Rain : मुसळधार पावसाने एसीपी ऑफिसचं छत कोसळलं ; ढिगाऱ्याखाली अडकल्याने सब इन्स्पेक्टरचा मृत्यू)

गडचिरोलीच्या काटेझारी गावात पहिल्यांदा एसटी बस धावल्या
‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले, “महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील काटेझारी गावातील लोक वर्षानुवर्षे या दिवसाची वाट पाहत होते. पूर्वी येथे कधीही बस धावली नव्हती, कारण हे गाव माओवादी हिंसाचाराने प्रभावित होते. तसेच जेव्हा बस पहिल्यांदाच गावात पोहोचली तेव्हा लोकांनी ढोल वाजवून तिचे स्वागत केले. माओवादाच्या विरोधात सामूहिक लढाईमुळे, माओवादी हिंसाचारग्रस्त भागातही मूलभूत सुविधा पोहोचू लागल्या आहेत.

(हेही वाचा – Fake call center : पुण्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, परदेशी नागरिकांना धमकावून कोट्यवधींची फसवणूक उघडकीस)

गुजरातमधील गीरमध्ये सिंहांची संख्या ६७४ वरून ८९१ पर्यंत वाढली
पंतप्रधान मोदी म्हणाले, गुजरात मधील गीरमध्ये सिंहांशी संबंधित एक आनंदाची बातमी सांगू इच्छितो. गेल्या पाच वर्षांत गुजरातमधील गीरमध्ये सिंहांची संख्या ६७४ वरून ८९१ झाली आहे. सिंह गणनेनंतर उघड झालेली सिंहांची ही संख्या खूप उत्साहवर्धक आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ३५ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात ११ जिल्ह्यांमध्ये सिंहांची गणना करण्यात आली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.