Delhi Rain : मुसळधार पावसाने एसीपी ऑफिसचं छत कोसळलं ; ढिगाऱ्याखाली अडकल्याने सब इन्स्पेक्टरचा मृत्यू

Delhi Rain : मुसळधार पावसाने एसीपी ऑफिसचं छत कोसळलं ; ढिगाऱ्याखाली अडकल्याने सब इन्स्पेक्टरचा मृत्यू

125

गाझियाबादमध्ये एक दुर्घटना (Delhi Rain) घडली आहे. अंकुर विहार एसीपी ऑफिसच्या खोलीचं छत अचानक कोसळलं. त्यामुळे खोलीत झोपलेले सब-इन्स्पेक्टर वीरेंद्र कुमार मिश्रा (५८) यांचा छताच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पावसामुळे एसीपी कार्यालयाचं छत कोसळलं. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. (Delhi Rain)

हेही वाचा-महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सची करण्याचे उद्दिष्ट : CM Devendra Fadnavis

उपनिरीक्षकांचा फोन लागत नव्हता आणि खोलीचा दरवाजा उघडा आढळल्याने संशय वाढला, तेव्हा शोध सुरू करण्यात आला. वीरेंद्र कुमार मिश्रा हे ढिगाऱ्याखाली आढळले. त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. रविवारी सकाळी मुसळधार पाऊस आणि वादळानंतर दिल्लीतील अनेक भागात पाणी साचलं होतं. (Delhi Rain)

हेही वाचा- Indian Economy : जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था !

मिंटो रोड, एअरपोर्ट टर्मिनल १ तसेच मोतीबागमध्ये पाणी साचल्याने अडचण निर्माण झाली आहे. यामुळे रविवार असला तरी अनेक भागातील वाहतूक प्रभावित झाली आहे. १०० हून अधिक विमानउड्डाणे प्रभावित झाली आहेत. २५ हून अधिक विमानफेऱ्या दुसरीकडे वळविण्यात आल्या आहेत. अनेक विमानांच्या फेऱ्यांना विलंब होत आहे. खराब हवामानामुळे रात्रीच्या वेळी उड्डाण करणारी विमाने विलंबाने होती असं विमानतळ प्रशासनाने सांगितलं आहे. (Delhi Rain)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.