Shiv Sena : आदित्य ठाकरे आणि राऊतांना धक्का, या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी ठेवली मशाल खाली

1277
Shiv Sena : आदित्य ठाकरे आणि राऊतांना धक्का, या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी ठेवली मशाल खाली
Shiv Sena : आदित्य ठाकरे आणि राऊतांना धक्का, या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी ठेवली मशाल खाली
  • मुंबई (विशेष प्रतिनिधी)

उबाठा शिवसेनेला आता धक्यावर धक्के बसू लागले असून मागील आठवड्यात दहिसरमधील निष्ठावान माजी नगरसेवक हर्षद प्रकाश कारकर (Harshad Prakash Karkar) आणि युवा सेनेच्या महिला पदाधिकारी दिक्षा कारकार आणि ज्येष्ठ माजी नगरसेविका साधना माने यांनी प्रवेश केल्यानंतर आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांचे खंदे समर्थक असलेल्या राजराजेश्वरी रेडकर (Rajrajeshwari Redkar) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक गणेश सानप आणि माजी नगरसेविका सुजाता सानप यांनीही शिवसेनेत प्रवेश करून उबाठाला एकच धक्का दिला आहे.

WhatsApp Image 2025 05 24 at 5.51.25 PM

कुलाबा विधानसभेतील मुंबई महापालिका स्थायी समिती सदस्या उबाठाच्या माजी नगरसेविका सुजाता सानप, उबाठाचे कुलाबा विधानसभा संघटक गणेश सानप, जगदिश मथणे, अनिल वाळुंज, शरद वाघ, अभिषेक वाघ, फैजल कुरेशी, शुभम पेढांबकर यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. गणेश सानप आणि सुजाता सानप हे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार आणि शिवसेना नेते अनिल देसाई (Anil Desai) यांचे तसेच युवा नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे कट्टर समर्थक मानले जात आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कुलाबा विधानसभेतून इच्छुक उमेदवार म्हणून तसेच दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पदासाठी त्यांचे नाव चर्चेत होते.

(हेही वाचा – Palestine ला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्यास पाठिंबा देणाऱ्या Canada वर इस्रायलचा पलटवार)

तसेच विक्रोळी विधानसभेतील महापालिकेच्या माजी नगरसेविका राजराजेश्वरी रेडकर (Rajrajeshwari Redkar) यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. विक्रोळी विधानसभेतील माजी नगरसेवक उपेंद्र सावंत, सुवर्णा करंजे, चंद्रावती मोरे यांच्यानंतर माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आता आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांच्या कट्टर समर्थक असलेल्या राजराजेश्वरी रेडकर यांनीही शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे रेडकर यांनी प्रवेश केल्यामुळे उबाठा शिवसेनेचा शेवटचा नगरसेवकही गेल्यामुळे राऊतांकडे एकही नगरसेवक आता उरलेला नाही.

तसेच गोरेगावच्या माजी ज्येष्ठ नगरसेविका तसेच माजी महिला विभाग संघटक साधना माने यांनीही शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला असून सन २०१७च्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांपैंकी उबाठाच्या एकूण १०२ पैंकी ४५ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, तर उबाठा शिवसेनेकडे अजुनही ५५ माजी नगरसेवक आहेत, तर दोन माजी नगरसेवकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेतील उबाठाचे जवळपास ६५ नगरसेवक शिवसेनेत (Shiv Sena) दाखल झाले असलयचा दावा शिवसेनेने असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मिळून नगरसेवकांची मोठी फौज शिवसेनेत आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचाच भगवा फडकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.