“पूर्व विदर्भात काँग्रेसची स्वबळाची रणनिती; ‘Mahavikas Aghadi’त नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता?”

40
"पूर्व विदर्भात काँग्रेसची स्वबळाची रणनिती; 'Mahavikas Aghadi'त नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता?"

पूर्व विदर्भात काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढण्याची भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीतील एकजूट धोक्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे प्रभारी आणि काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी (Abhijit Wanjarri) यांनी थेटपणे सांगितले की, “स्थानिक कार्यकर्त्यांची भावना स्वबळावर लढण्याचीच असून, आम्ही त्यादृष्टीने तयारी केली आहे.”

महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) एकत्र निवडणुका लढण्याचा निर्णय अंतिमतः प्रदेशाध्यक्ष आणि दिल्लीतील नेत्यांकडून होणार असला, तरी जिल्हा व तालुका स्तरावरील काँग्रेस कार्यकर्ते मात्र “एकला चालो रे” च्या भूमिकेत दिसत आहेत.

(हेही वाचा – हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी आवश्यक पाऊले उचला; MLA T Raja Singh यांची मागणी)

“सर्व जागांवर उमेदवारांची चाचपणी पूर्ण”

आमदार वंजारी यांनी स्पष्ट केले की, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसने तयारी पूर्ण केली आहे. “सर्व जागांवर इच्छुकांची चाचपणी केली असून, पक्ष स्वबळावर लढण्यास सक्षम आहे,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

“पूर्व विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला होणार?”

पूर्व विदर्भातील राजकीय चित्र लक्षात घेता, काँग्रेस (Congress) पुन्हा बालेकिल्ला निर्माण करण्याच्या तयारीत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर उतरल्यास इतर घटक पक्षांपुढेही स्वतंत्र लढण्याचा दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Bangladesh Violence : शेख हसीना असो किंवा आता लष्कर विरोधात आंदोलन, बांगलादेशात हिंदूंचाच बळी !)

“महाविकास आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह”

काँग्रेसच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) घटक पक्षांमध्ये मतभेदाची चिन्हं स्पष्टपणे दिसू लागली आहेत. युती टिकणार की तुटणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र काँग्रेसच्या भूमिकेमुळे आगामी निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राजकारणाचा रंग गडद होत असताना, पूर्व विदर्भातील काँग्रेसच्या या ‘स्वबळ’ स्टँडने आगामी निवडणुकीच्या (Upcoming elections) रणनीतीला नवे वळण मिळण्याचे संकेत दिले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.