Asia Cup 2025 : पाकिस्तानी संघाला क्रीडाविश्वातही धक्का बसणार?; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाकडे लक्ष

Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान तणावानंतर केंद्र सरकारने आगामी आशिया कप हॉकी(Asia Cup 2025)च्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी संघाला प्रवेश नाकारण्याची शक्यता आहे. दरम्यान, आशिया कपमधील हॉकीचे सामने पाकिस्तानी संघाला खेळता येणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. विशेष महत्त्वाचे म्हणजे दि. २७ ऑगस्ट ते ०७ सप्टेंबर दरम्यान बिहारमधील राजगीर येथे हॉकी आशिया कप २०२५ खेळविण्यात येणार आहे.(Asia Cup 2025)

81

Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान तणावानंतर केंद्र सरकारने आगामी आशिया कप हॉकी(Asia Cup 2025)च्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी संघाला प्रवेश नाकारण्याची शक्यता आहे. दरम्यान, आशिया कपमधील हॉकीचे सामने पाकिस्तानी संघाला खेळता येणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. विशेष महत्त्वाचे म्हणजे दि. २७ ऑगस्ट ते ०७ सप्टेंबर दरम्यान बिहारमधील राजगीर येथे हॉकी आशिया कप २०२५ खेळविण्यात येणार आहे.(Asia Cup 2025)

(हेही वाचा इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघाची घोषणा; Shubman Gill कडे कसोटी नेतृत्वाची धुरा )

तथापि, अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झाली नसून हॉकी इंडिया भारत सरकारच्या भूमिकेच्या प्रतीक्षेत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढ झाली. त्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत लष्करी कारवाई केली. तसेच, राजनैतिक पध्दतीने जागतिक स्तरावर पाकिस्तानची चहूबाजूने कोंडी केली. त्यानंतर आता पाकिस्तानला हिरो आशिया कप(Asia Cup 2025)हॉकीमध्ये सहभागी होणे कठीण झाले आहे.

(हेही वाचा Germany On Operation Sindoor: जर्मनीचा भारताला पाठिंबा; एस. जयशंकर यांच्या भेटीनंतर परराष्ट्र मंत्री म्हणाले… )

विशेष म्हणजे केंद्रीय क्रीडा मंत्रालयातील सूत्रांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाविरुद्ध निर्णायक लढाई लढत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कोणताही सामना होणार नाही. एकंदरीत, भारत सरकारच्या निर्णयानंतरच पाकिस्तानी हॉकी संघ आशिया कप स्पर्धेत सहभागी होणार की नाही याबाबत स्पष्टता येईल.

२७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान हॉकी आशिया कप स्पर्धा

येत्या २७ ऑगस्टपासून बिहारमधील राजगीर येथे हिरो आशिया कप हॉकी(Asia Cup 2025) आयोजन करण्यात येणार आहे. ०७ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या क्रीडास्पर्धेचं यजमानपद भारत भूषविणार असून जपान, चीन, कोरिया, मलेशिया, ओमान, चिनी तैपेई आणि पाकिस्तान यात सहभागी होणार आहेत. त्यात पाकिस्तानच्या सहभागाविषयी अजून कुठलाही निर्णय झालेला नाही. पुढील वर्षी नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर आशिया कप स्पर्धा महत्त्वाची असणार आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची नाचक्की

दि. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा जीव गेला होता. यानंतर भारत सरकारने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत ०९ दहशतवादी तळं उध्द्वस्त करण्यात आले होते. त्याचबरोबर, केंद्र सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले होते. पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानावर राजनैतिक दबाव आणत दहशतवादी कारवाया रोखण्याकरिता पावले उचलली आहेत. तसेच, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाविरुद्ध कारवाई करत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतीही चर्चा होणार नाही, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानला ठणकावले आहे.(Asia Cup 2025)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.