कर्नाटकात Gang Rape च्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या आरोपींची काढली मिरवणूक

जामीन मिळालेल्या आरोपींची नावे आफताब चंदनाकट्टी, मदार साब मंदक्की, समीवुल्ला लालनावर, मोहम्मद सादिक अगासिमानी, शोएब मुल्ला, तौसिप चोटी आणि रियाज सविकेरी अशी आहेत.

96

कर्नाटकमध्ये सामूहिक बलात्कार (Gang Rape) प्रकरणातील सात प्रमुख आरोपींना जामिनावर सोडण्यात आले, त्यानंतर त्यांची  हावेरी जिल्ह्यात भव्य मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. याची व्हिडीओ जेव्हा सोशल मीडियात व्हायरल झाले तेव्हा या प्रकरणी पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला.

या सात आरोपींना आयपीसी कलम ३७६ ड अंतर्गत १७ महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्यांना हावेरी उप-कारागृहात ठेवण्यात आले होते. २० मे रोजी हावेरीच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. त्यांच्या सुटकेनंतर, आरोपींच्या समर्थकांनी त्यांची सार्वजनिक मिरवणूक काढून स्वागत केले, ज्यावर बरीच टीका झाली. चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा समावेश असलेली ही मिरवणूक हावेरी उप-कारागृहापासून जिल्ह्यातील अक्की अलूर शहरापर्यंत काढण्यात आली. (Gang Rape)

(हेही वाचा डोनाल्ड ट्रम्प यांनी Apple वर २५ टक्के कर लावला, तरीही iphone स्वस्तात मिळणार; कारण आहे भारत…)

जामीन मिळालेल्या आरोपींची नावे आफताब चंदनाकट्टी, मदार साब मंदक्की, समीवुल्ला लालनावर, मोहम्मद सादिक अगासिमानी, शोएब मुल्ला, तौसिप चोटी आणि रियाज सविकेरी अशी आहेत, त्यांनी २६ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केला होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये, या आरोपींचे समर्थक घोषणाबाजी करताना दिसत आहेत आणि आरोपी विजयाचे चिन्ह दाखवत आहेत. या घटनेवर प्रतिक्रिया देताना, हावेरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अंशु कुमार श्रीवास्तव म्हणाले की, आरोपींविरुद्ध बेकायदेशीरपणे एकत्र येणे आणि बेदरकारपणे गाडी चालवणे या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अपील करण्यात येणार आहे. या प्रकरणात एकूण १९ आरोपी आहेत, ज्यात सात मुख्य आरोपींचा समावेश आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर बारा जणांची १० महिन्यांपूर्वी जामिनावर सुटका झाली होती.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.