डोनाल्ड ट्रम्प यांनी Apple वर २५ टक्के कर लावला, तरीही iphone स्वस्तात मिळणार; कारण आहे भारत…

१००० डॉलरच्या आयफोनमध्ये Apple चे मार्जिन सर्वाधिक आहे. यामध्ये कंपनीला ४५० डॉलर मिळतात.

91

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी Apple वर २५ टक्के कर लादण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की जर अमेरिकेत विकले जाणारे आयफोन अमेरिकेत बनवले गेले नाहीत तर कंपनीवर २५ टक्के कर लादला जाईल. ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर, अमेरिकेत iphone च्या किमती वाढू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र ट्रम्प यांनी २५ टक्के कर लादला तरी भारतात बनवलेले आयफोन अमेरिकन बाजारात परवडतील. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हनुसार, भारतात बनवलेल्या आयफोनवर २५ टक्के कर लादला तरी उत्पादन खर्च अमेरिकेत बनवलेल्या आयफोनपेक्षा कमी असेल.

iphone स्वस्त का मिळतील? 

जीटीआरआय अहवालानुसार या फोनवर शुल्क लावले तरी भारतात उत्पादन स्वस्तात होईल. १००० डॉलरच्या आयफोनमध्ये Apple चे मार्जिन सर्वाधिक आहे. यामध्ये कंपनीला ४५० डॉलर मिळतात. क्वालकॉम आणि बोर्डेकॉम सारख्या अमेरिकन घटक उत्पादकांकडून प्रत्येकी ८० डॉलर्स आकारले जातात. तर तैवान चिप उत्पादक $१५० आकारतात. दक्षिण कोरिया OLED स्क्रीन आणि मेमरी चिप्ससाठी $९० आकारतो आणि जपान पुरवठा घटकांसाठी $८५ आकारतो. इतर लहान भागांची किंमत $४५ आहे. GTRI म्हणते की, जरी चीन आणि भारत iphone उत्पादनात मोठे खेळाडू असले तरी, प्रत्येक युनिटवरील त्यांची कमाई सुमारे $३० आहे. याचा अर्थ भारत आणि चीनला आयफोनच्या एकूण किमतीच्या फक्त ३% मिळतात. या आधारावर, अहवालात असे म्हटले आहे की, जरी भारतात बनवलेल्या आयफोनवर टॅरिफ लावले तरी ते स्वस्त दरात मिळतील.

(हेही वाचा Bangladesh Violence : शेख हसीना असो किंवा आता लष्कर विरोधात आंदोलन, बांगलादेशात हिंदूंचाच बळी !)

अमेरिकेत बनवलेले आयफोन महाग असतील भारत आणि अमेरिकेत कामगार खर्चात मोठा फरक आहे. भारतात, फोन असेंब्लीचे काम करणाऱ्या कामगारांना सुमारे $२३० मिळतात. दुसरीकडे, कॅलिफोर्निया, अमेरिकेत कामगार खर्च सुमारे $२९०० पर्यंत पोहोचतो, जो भारतातील कामगार खर्चापेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत, भारतात iphone च्या असेंब्लीचा खर्च $३० आहे, तर अमेरिकेत ही किंमत $390 पर्यंत पोहोचते. याशिवाय, भारतात Apple ला PLI योजनेचा फायदा देखील मिळतो. जर Apple ने आपले उत्पादन अमेरिकेत हलवले तर कंपनीचा नफा $450 वरून $60 पर्यंत कमी होईल.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.