Gujarat : एलओसीवर पाकिस्तानी घुसखोर ठार ; सीमेवर बीएसएफ जवानांनी घातले कंठस्नान

Gujarat : एलओसीवर पाकिस्तानी घुसखोर ठार ; सीमेवर बीएसएफ जवानांनी घातले कंठस्नान

51
Gujarat : एलओसीवर पाकिस्तानी घुसखोर ठार ; सीमेवर बीएसएफ जवानांनी घातले कंठस्नान
Gujarat : एलओसीवर पाकिस्तानी घुसखोर ठार ; सीमेवर बीएसएफ जवानांनी घातले कंठस्नान

ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताकडून मोठ्या प्रमाणात पराभव पत्करल्यानंतरही पाकिस्तानातून घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत. ताज्या घडामोडीत, गुजरातमधील (Gujarat) बनासकांठा येथे शुक्रवारी रात्री एका पाकिस्तानी घुसखोराने भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु बीएसएफच्या जवानांनी त्याला ठार केले. (Gujarat)

हेही वाचा-Gadchiroli Naxalites Encounter : गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई ! चार जहाल नक्षलींना केले ठार

या प्रकरणाबद्दल अधिक माहिती देताना, बीएसएफने आज, शनिवारी सांगितले की, बीएसएफ जवान गस्तीवर असताना एका संशयास्पद व्यक्ती आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून कुंपणाकडे येताना दिसला. जवानांनी घुसखोराला थांबण्याचा इशारा दिला पण तो पुढे येतच राहिला. त्यामुळे जवानांनी गोळीबार करत त्याला ठार केले. (Gujarat)

हेही वाचा- Maharashtra Rain : अवकाळीचे संकट कायम असताना दोन दिवसांत मान्सून केरळमध्ये पोहचणार !

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, बीएसएफने पाकिस्तानच्या प्रत्येक कुरापतीला योग्य उत्तर देऊन देशाच्या सुरक्षेसाठी मोलाचे योगदान दिले आहे. या कारवाईदरम्यान, सीमेवर तैनात असलेले सैनिक पायी, वाहनाने आणि उंटावरून गस्त घालून शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर कडक नजर ठेवत आहेत. (Gujarat)

हेही वाचा- Corona Update : मुंबईत दिवसभरात 35 नवीन कोरोना रुग्ण ; काय काळजी घ्याल ?

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनसारख्या आधुनिक शस्त्रांचा वापर करून पश्चिम सीमावर्ती भागात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बीएसएफ आणि भारतीय सैन्याच्या जवानांनी संयुक्तपणे शत्रुचा मुकाबला करीत सर्व कट उधळून लावलेत. (Gujarat)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.