Corona Update : मुंबईत दिवसभरात 35 नवीन कोरोना रुग्ण ; काय काळजी घ्याल ?

Corona Update : मुंबईत दिवसभरात 35 नवीन कोरोना रुग्ण ; काय काळजी घ्याल ?

140
Corona Update : मुंबईत दिवसभरात 35 नवीन कोरोना रुग्ण ; काय काळजी घ्याल ?
Corona Update : मुंबईत दिवसभरात 35 नवीन कोरोना रुग्ण ; काय काळजी घ्याल ?

राज्यात कोरोनाचे (Corona Update) नवे 45 रुग्ण आढळले आहेत. एकट्या मुंबईमध्ये काल सर्वाधिक 35 रुग्ण सापडले. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आता 185 वर पोहोचली आहे. यामुळे मुंबई महापालिकेचा आरोग्य विभागही सतर्क झाला असून त्यांनी विविध रुग्णालयांत राखीव खाटांची व्यवस्था केली असून गरज पडल्यास आरोग्य सेवेत वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले. (Corona Update)

आतापर्यंत 81 रुग्ण पूर्णपणे बरे
मुंबई शहरात मे महिन्यापासून रुग्णांची (Corona Update) संख्या वाढली आहे. मात्र हे सर्व रुग्ण फ्ल्यू आणि सहव्याधी असलेले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता, काळजी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले. जानेवारी 2025 पासून राज्यात एकूण 6,819 कोविड चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 210 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात केवळ मुंबई विभागात एकूण 185 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 81 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. (Corona Update)

काय काळजी घ्याल ?
जर तुम्हाला थंडी, ताप, कणकणी, हातपाय वळणे, सर्दी, फडसे यापैकी काहीही जाणवत असेल तर डॉक्टरच्या सल्ल्याने औषध घ्या. या काळात पाणी उकळून प्या. तोंडावर मास्क किंवा रुमालचा वापर करा. सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीत जाण्याचं टाळा. वेळेवर आहार आणि औषध घ्या. यामुळं तुम्ही कोरोनावर मात करू शकाल. तसेच खोकला, सर्दी, फडसे, थंडी, ताप, कणकणी, हातपाय वळणे हे असताना जरी तुम्ही औषधं घेतली तरीसुद्धा सहा ते आठ दिवस तुम्हाला वरील त्रास जाणवेलच. त्यामुळं घाबरून जाऊ नका. (Corona Update)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.