-
प्रतिनिधी
आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला मोबाईल फोन मतदानाच्या दिवशी केंद्रात (Polling Center) घेऊन जाता येत नाही. मात्र आता मतदारांसाठी दिलासादायक निर्णय घेत, मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यामुळे नागरिकांचा मोबाईल सुरक्षित राहणार आहे आणि मतदान प्रक्रियाही सुरळीत पार पडणार आहे.
(हेही वाचा – Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने शौर्य, विज्ञान आणि स्मृतिचिन्ह पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन)
ग्रामीण आणि शहरी भागांतील मोबाईलच्या वाढत्या वापराची, तसेच वृद्ध, महिला आणि दिव्यांग मतदारांच्या अडचणींची दखल घेऊन आयोगाने मतदान केंद्राच्या (Polling Center) प्रवेशद्वाराजवळ मोबाईल ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. बॉक्स किंवा पोत्यांद्वारे ही सोय दिली जाईल. तसेच, मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईलचा वापर तसेच प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. केवळ बंद अवस्थेतील मोबाईल घेऊन जाण्यास अनुमती असेल. काही विशिष्ट परिस्थितीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अपवाद देण्याचा अधिकार आहे.
(हेही वाचा – शिवभोजन थाळी बंद होणार नाही; Chhagan Bhujbal यांचा ठाम निर्धार)
या निर्णयानुसार, उमेदवारांचे मदत बूथसुद्धा आता मतदान केंद्रापासून (Polling Center) १०० मीटर अंतराच्या बाहेर ठेवावे लागतील. यामार्फत प्रचारावर मर्यादा घालून मतदारांवर दबाव येऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू व डॉ. विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, आयोग मतदारांसाठी मतदान प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी सातत्याने नवनवीन निर्णय घेत आहे. मोबाईलवर निर्बंध ठेवत आयोगाने एकीकडे सुरक्षेला प्राधान्य दिले आहे, तर दुसरीकडे मतदारांची सोय लक्षात घेऊन त्यांच्या मोबाईलसाठी योग्य ती व्यवस्था करून एक संतुलित आणि जागरूक निर्णय घेतला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community