-
प्रतिनिधी
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट संदेश देत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपले राजकीय वजन पुन्हा एकदा दाखवून दिले. भाजपाच्या जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष तानाजीराव थोरात यांनी या निवडणुकीत उडी घेतली, मात्र अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पॅनलने सर्व २१ जागांवर एकहाती विजय मिळवला आहे.
या विजयाबाबत मतदारांचे आभार मानण्यासाठी झालेल्या सभेत अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट भाजपावर निशाणा साधला. “भाजपाचे जे काही मतदारसंघ आहेत, तिथे देखील माझे कार्यकर्ते आहेत. मी देखील त्या मतदारसंघात लक्ष घालेल,” असा ठाम इशारा देत त्यांनी भाजपाला राजकीय आव्हानच दिले. पवार (Ajit Pawar) म्हणाले, “छत्रपती सहकारी साखर कारखान्याला मतदारांनी ऊस दर कमी असतानाही निर्विवाद बहुमत दिले. बारामतीच्या सभासदांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. सोमेश्वर कारखान्याला आम्ही अडचणीतून बाहेर काढले. मी जेव्हा काही ठरवतो, तेव्हा ते पूर्ण करूनच दम घेतो.”
(हेही वाचा – Operation Sindoor : पहलगाम हल्ल्याआधी ‘हे’ ठिकाणं होतं टार्गेटवर ; ISI एजंट अन्सारुल मियाँने चौकशीदरम्यान केले उघड)
माळेगावच्या निवडणुकीकडे लक्ष, विरोधकांवर टीका
छत्रपती कारखान्यातील यशानंतर अजित पवारांचे (Ajit Pawar) लक्ष आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याकडे आहे. एका मेळाव्यात त्यांनी काही नेत्यांची नाव न घेता टीका केली. “काहींना इतकी घाई होती की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सतत निवडणुका घ्या म्हणत होते. मी देखील महायुतीतील घटक आहे. सतत मुंबईला येऊन दबाव टाकण्याची गरज नव्हती,” असे त्यांनी ठणकावले.
ते पुढे म्हणाले, “माळेगाव कारखाना १५ लाख मेट्रिक टन साखर उत्पादनास पोहोचला आहे. १९९१ नंतर पवार साहेबांनी मला संधी दिली, आणि ती मी सोनं केलं. आता मी स्वतः पॅनल उभं करणार असून, चेअरमन कोण असणार हेही प्रचाराच्या नारळातून जाहीर करणार आहे.” या घणाघाती भाषणातून अजित पवारांनी (Ajit Pawar) राजकीय खेळी अधिक तीव्र करण्याचा संकेत दिला असून, येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीत अंतर्गत कुरघोडीही वाढण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community