हरियाणा येथील युट्यूबर ज्योती मल्होत्राविरुद्धच्या हेरगिरी प्रकरणात नवनवे तपशील समोर आले आहेत. ज्यामुळे पाकिस्तानी कार्यकर्त्यांशी असलेल्या तिच्या संबंधांबद्दल संशय आणखी वाढला आहे. युट्यूबर ज्योती मल्होत्राबद्दल तपास यंत्रणांना बरीच संवेदनशील झाली असून तिच्याबद्दल धक्कादायक माहिती मिळत आहे. 11 फेब्रुवारी 2023 रोजी, जेव्हा मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन झाले आणि वंदे भारत पहिल्यांदाच त्या मार्गावर सुरू झाली, तेव्हा ज्योतीने या पहिल्या रनमध्ये भाग घेतलाच नाही तर संपूर्ण मार्गाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केले. इतकेच नाही तर शिर्डी पोहोचल्यानंतरही तिने अनेक ठिकाणांचे व्हिडिओ आणि फोटोशूट केले. ही संपूर्ण कृती पूर्वनियोजित होती का? आणि तिचा उद्देश संवेदनशील माहिती गोळा करणे होता का? याचा तपास आता सुरक्षा यंत्रणा करत आहेत. (Jyoti Malhotra)
(हेही वाचा – Boycott Turkey : तुर्कीविरुद्धचा रोष उफळला ! ‘या’ कारणामुळे भारताचा कापूस व्यापार थांबवण्याचा निर्णय)
2023 मध्ये चार वेळा मुंबईत येऊन तिच्यावर रेकीचा आरोप
तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, ज्योती मल्होत्रा 2023 मध्ये चार वेळा मुंबईत आली होती. प्रत्येकवेळी तिने शहरातील वेगवेगळ्या भागांचे व्हिडिओ बनवले होते, तिच्याकडून तीन मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात फोटो आणि व्हिडिओ डेटा सापडला आहे.
ज्योती मुबंईत प्रवास कधी कधी केला?
12 मे 2023 : तेजस राजधानी एक्सप्रेसने दिल्लीहून मुंबईत आली आणि 13 मे रोजी शहरातील काही भागांना भेट देऊन फोटो आणि व्हिडिओ काढले.
20 जुलै 2023: गरीब रथ एक्सप्रेसने मुंबईत पोहोचली, काही दिवस राहिली आणि विविध भागांचे रेकॉर्डिंग केले.
3 ऑक्टोबर 2023 : विमानाने मुंबईत आली आणि 22 दिवस राहिली. या काळात विमानतळ, मेट्रो आणि लोकल ट्रेनचे व्हिडिओ बनवले.
25 ऑक्टोबर 2023 : विमानाने दिल्लीला परतली.
2024 मध्ये तीन वेळा मुंबईत येऊन रेकी केल्याचा आरोप आहे.
जुलै 2024 मध्ये लक्झरी बसने मुंबईत पोहोचली
ऑगस्ट 2024 मध्ये अहमदाबादहून कर्णावती एक्सप्रेसने आली.
सप्टेंबर 2024 मध्ये नवी दिल्लीहून पंजाब मेलने प्रवास केला.
ज्योती मल्होत्राचा पोलिस कोठडीतील मुक्काम चार दिवसांनी वाढला
दरम्यान, ज्योतीला 16 मे रोजी अटक करण्यात आली असून तिची कोठडी 23 मे चार दिवसांनी वाढवण्यात आली आहे. पाच दिवसांच्या रिमांडवर असताना, हिसार पोलिसांव्यतिरिक्त, एनआयए, मिलिटरी इंटेलिजेंस, आयबी आणि इतर गुप्तचर संस्थांनी तिची चौकशी केली आहे. पहलगाम हल्ल्यापूर्वी आणि नंतर ती कोणाच्या संपर्कात होती? ती कोणाशी बोलली? तिचे मोबाईल शोधले जात आहेत. एनआयए तिला पहलगामलाही घेऊन जाऊ शकते. पहलगाम हल्ल्यापूर्वी ज्योतीने काश्मीरमधील त्या ठिकाणांचे व्हिडिओ बनवले कारण जिथे सैन्याची तैनाती किंवा हालचाल नव्हती. तपास यंत्रणा तपास करत आहे की ज्योतीने फक्त प्रवासाच्या उद्देशाने व्हिडिओ बनवले होते की त्यात पाकिस्तानी एजंटांसाठी कोड लपलेला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community